For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुलगाममध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुलगाममध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक
Advertisement

लष्कराचा परिसराला वेढा : लपलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील हादीगाम गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. बुधवारी रात्री सुरू झालेली ही चकमक गुऊवारी पहाटेपर्यंत सुरू होती. अद्याप कोणाचा बळी गेल्याचे वृत्त नाही. हादीगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. याचदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत कडक बंदोबस्तात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. जम्मू-काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लष्कर यांच्या संयुक्त पथकाने विशेष मोहिमेत सहभाग घेतला. सुरक्षा दलांनी परिसराची नाकाबंदी करत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी व्यापक रणनीती आखली. सुरुवातीला 2-3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, या मोहिमेला पूर्ण यश आले नसल्याने शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.