बेळगाव विमानतळ सुरक्षेसाठी ‘सेक्युरिटी ऑडिट’
बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेक्युरिटी ऑडिट करण्यात आले. विमानतळावरील सर्व शॉप्स, एअर लाईन्सची कार्यालये, एफटीओची कार्यालये यांचाही यामध्ये सहभाग होता. या सेक्युरिटी ऑडिटमुळे प्रवाशांना निर्धोकपणे विमान प्रवास करता येणार आहे. दोन दिवसांपूर्वी एअर पोर्ट अॅथॉरिटीकडून विमानाच्या उड्डाणाबाबतची तपासणी करण्यात आली. फ्लाईट इन्स्पेक्शन युनिट (एफआययू) कडून बेळगाव विमानतळावर एका विमानाद्वारे तपासणी करण्यात आली. धावपट्टीवरून विमानाचे टेक अप तसेच लँडिंग करताना येणाऱ्या समस्या नोंद करण्यात आल्या. त्याचबरोबर इन्स्ट्रूमेंटल लँडिंग सिस्टिम कशा पद्धतीने कार्यरत होते, याचीही तपासणी झाली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी इन्स्पेक्शन युनिटचे स्वागत केले. सेक्युरिटी ऑडिटमुळे ज्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव आहे, त्याठिकाणी नवी यंत्रणा कार्यरत करण्याबाबत सूचना केली.