महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसरी कसोटी रंगतदार स्थितीत

06:17 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 202 धावा तर न्यूझीलंडला 6 गड्यांची गरज

Advertisement

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

Advertisement

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरु असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 202 धावांची गरज आहे तर यजमान न्यूझीलंडला ही मालिका बरोबरीत राखण्यासाठी विजयाची गरज असून त्यांना ऑस्ट्रेलियाचे 6 गडी बाद करणे गरजेचे आहे.

या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच जिंकली आहे. या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने 5 तर स्टार्कने 3 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 256 धावा जमवित न्यूझीलंडवर 94 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात लाबुशेनने 12 चौकारांसह 90 धावा झळकाविल्या. न्यूझीलंडचा मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 67 धावांत 7 गडी बाद केले.

94 धावांनी पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडने रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावाला 2 बाद 134 या धावसंख्येवरुन पुढे प्रारंभ केला. आणि त्यांचा दुसरा डाव 372 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 279 धावांचे आव्हान मिळाले. पण ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात घसरण झाली असून त्यांनी दिवस अखेर 4 बाद 77 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मॅट हेन्री आणि सीयर्स यांनी प्रभावी गोलंदाजी करताना प्रत्येकी 2 गडी बाद केले.

मिचेल, रवींद्र यांची अर्धशतके

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावामध्ये सलामीच्या लॅथमने 168 चेंडूत 8 चौकारांसह 73, केन विल्यम्सनने 107 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा, रचिन रवींद्रने 153 चेंडूत 10 चौकारांसह 82 तसेच मिचेलने 98 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 58 धावा झळकाविल्या. न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांनी अर्धशतके नोंदविली. कुगलेजीनने 49 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 44 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाच्या कॅरेने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 4 झेल टिपले. विल्यम्सन आणि लॅथम यांनी दुसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागिदारी केली. विल्यम्सन बाद झाल्यानंतर लेथम आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भर घातली. लॅथम तंबूत परतल्यानंतर रचिन रवींद्रला मिचेलकडून चांगली साथ लाभली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 123 धावांची शतकी भागिदारी केल्याने न्यूझीलंडला 372 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 62 धावांत 4 तर लियॉनने 49 धावांत 3, स्टार्क, हॅझलवूड आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 7 गडी बाद करणाऱ्या मॅट हेन्रीने सलामीच्या स्टीव्ह स्मिथला 9 धावांवर पायचीत केले. त्यानंतर सियर्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर लाबुशेनला टिपले. त्याने 6 धावा जमविल्या. हेन्रीच्या गोलंदाजीवर ख्वाजा साऊदीकरवी झेलबाद झाला. त्याने 11 धावा केल्या. सीयर्सने ग्रीनचा 5 धावांवर त्रिफळा उडविला. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 4 बाद 34 अशी केविलवाणी झाली होती. हेड आणि मार्श यांनी दिवसअखेर संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. हेड 2 चौकारांसह 17 तर मार्श 4 चौकारांसह 27 धावांवर खेळत असून या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 43 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्री आणि बेन सीयर्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड प. डाव 162, ऑस्ट्रेलिया प. डाव 256, न्यूझीलंड दु. डाव 108.2 षटकात सर्व बाद 372 (लॅथम 73, विल्यम्सन 51, रचिन रवींद्र 82, मिचेल 58, ब्लंकेट 9, फिलिप्स 16, कुगलेजिन 44, हेन्री 16, अवांतर 22, कमिन्स 4-62, लियॉन 3-49, स्टार्क, हॅझलवूड, ग्रीन प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 24 षटकात 4 बाद 77 (स्मिथ 9, ख्वाजा 11, लाबुशेन 6, ग्रीन 5, हेड खेळत आहे 17, मार्श खेळत आहे 27, अवांतर 2, मॅट हेन्री 2-37, सीयर्स 2-22).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article