महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसरी आण्विक पाणबुडी नौदलात सामील

07:05 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आयएनएस अरिघात’मुळे वाढले सागरी बळ : चीनचे आव्हान पेलण्यास मदत

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारतीय नौदलाला स्वदेशी आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ मिळाली आहे. या पाणबुडीला स्ट्रेटेजिक फोर्सेस कमांडमध्ये सामील करण्यात आले आहे. या पाणबुडीत अनेक प्रकारचे नवे अपग्रेड करण्यात आले आहेत. भारतीय नोदलाची दुसरी आण्विक इंधनाने संचालिन होणारी आणि आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांने युक्त ही पाणबुडी अरिहंत क्लासची अत्याधुनिक एसएसबीएन आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या कारवाया पाहता भारताला अधिक संख्येत आण्विक पाणबुड्यांचा नौदलाच्या ताफ्यात समावेश करणे क्रमप्राप्त ठरले आहे.

आयएनएस अरिघात या पाणबुडीची निर्मिती विशाखापट्टणम येथील शिपबिल्डिंग सेंटरमध्ये करण्यात आली आहे. याचे डिस्प्लेसमेंट 6 हजार टन असून लांबी सुमारे 113 मीटर इतकी आहे. ही पाणबुडी पाण्यात 980 ते 1400 फूट खोलवर जाऊ शकते आणि याची कक्षा अमर्यादित आहे. म्हणजेच विशिष्ट स्थितीत ही पाणबुडी अमर्यादित काळापर्यंत समुद्रात राहू शकते. आयएनएस अरिघातमध्ये 12 के15 एसएलबीएम तैनात करण्यात आले आहेत. सबमरीन लाँच बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 750 किलोमीटर इतका आहे. यात 4 के4 क्षेपणास्त्रs त्यांचा मारक पल्ला 3500 किलोमीटर इतका मोठा आहे. याचबरोबर या पाणबुडीत 21 इंचाच्या 6 टॉरपीडो लावण्यात आले आहेत. तसेच अनेक टॉरपीडो ट्यूब्स अून ते सागरी सुरुंग पेरण्याचे काम करणार आहेत.

आयएनएस अरिघातमध्ये आण्विक रिअॅक्टर असून तो आण्विक इंधनाच्या माध्यमातून या पाणबुडीला पृष्ठभागावर 28 किलोमीटर प्रतितास तर पाण्याच्या आत 44 किलोमीटर प्रतितासाचा वेग प्रदान करणार आहे. आयएनएस अरिहंत आणि आता ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने देशाचे दोन्ही बाजूचे किनारे शत्रूच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहणार आहेत. पाकिस्तान किंवा चीन या दोन्ही देशांना या पाणबुडीमुळे हल्ला करण्याचे धाडस होणार नाही. याचबरोबर भारत तिसरी आण्विक पाणबुडी निर्माण करण्याच्या तयारीत आहे. भारताची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही 2014 मध्ये नौदलाच्या ताफ्यात सामील झाली होती. आयएनएस अरिहंतच्या तुलनेत आयएनएस अरिघात अधिक अत्याधुनिक आणि घातक आहे. भारतीय नौदल आणखी दोन आण्विक पाणबुड्यांची निर्मिती करवत असून त्या 2035-36 पर्यंत  निर्माण होणार आहेत.

आयएनएस अरिघातची वैशिष्ट्यो..

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article