कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांकवाळच्या उपसरपंचाचे फसवणूक करुन दुसरे लग्न

12:14 PM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को, पणजी : पहिले लग्न कायम असताना फसवणूक करून दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढल्याबद्दल सांकवाळचे उपसरपंच डेरिक वालिस याच्याविऊद्ध एफआयआर नोंदवण्याचा आणि सखोल तपास करण्याचा आदेश वास्कोच्या  प्रथम वर्ग  न्यायालयाच्या न्या. पूजा देसाई यांनी पोलिसांना दिला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी सांकवाळचा उपसरपंच डेरिक वालिस याच्याविऊद्ध द्विविवाह (बायगमी) कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सदर महिलेने 23 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. वालिस याने जेनेट डिसोझा हिच्यासोबत 7 मे 2012 रोजी वास्कोच्या सिव्हिल रजिस्ट्रारसमोर विवाहाची नोंद करण्यात आली होती. आरोपीने सदर महिलेला आपण घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून या खटल्याचा 1 फेब्रुवारी 2021 रोजीचा रोजनामा दाखवून दिशाभूल केली. त्यानंतर, दुसरे लग्न 20 जुलै 2021 रोजी ख्रिस्चन विवाह कायद्याखाली मुंबई येथे मॅरेज रजिस्ट्रारमध्ये केल्याची तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

पहिले लग्न कायम असताना आणि पहिली पत्नी जिवंत असताना,  फसवणूक करून दुस्रयांदा लग्न केल्यामुळे द्विविवाह (बायगमी ) कायद्याचा भंग केला आहे. तसेच चिखली - वास्को येथे एक घर बांधून राहण्याचे त्याने वचनही दिले होते. मात्र, आपल्याला एक मूल झाले असूनही 6 नोव्हेंबर 2021 पासून आरोपीने आपला त्याग केला असल्याची तक्रार सदर महिलेने वेर्णा पोलिसस्थानकात केली असता पोलिसांनी एफआयआरची नोंद करण्यास हयगय केल्याने ही महिला न्यायालयात पोचली होती. न्यायालयाने  दखलपात्र अश्या कुठल्याही गुह्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यावर आधी एफआयआर नोंद होणे आणि नंतर चौकशी सुऊ करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. जर पोलीस तक्रारीची नोंद घेत नसल्यास पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रार केल्यास ते चौकशीचा आदेश देऊ शकतात. असे होत नसल्यास न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वास्कोच्या  प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्या. पूजा देसाई यांनी सदर महिलेने केलेल्या तक्रारीवरून सांकवाळचा उपसरपंच डेरिक वालिस याच्याविऊद्ध एफआयआर  नोंदवण्याचा आणि सखोल तपास करण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article