For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संभाव्य 15 फुटबॉलपटूंची दुसरी यादी जाहीर

06:36 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
संभाव्य 15 फुटबॉलपटूंची दुसरी यादी जाहीर
Advertisement

, कुवैत व कतारविरुद्ध जूनमध्ये होणार लढती, दुखापतीमुळे संदेश बाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी वर्ल्ड कप पात्रता लढतीसाठी 15 सदस्यीय संभाव्य संघाची भुवनेश्वरमधील शिबिरासाठी ाघोषणा केली असून जखमी संदेश झिंगनला त्यात स्थान मिळालेले नाही. फिफा वर्ल्ड कप 2026 प्राथमिक जॉईंट क्वालिफिकेशन राऊंड 2 सामने कुवैत व कतारविरुद्ध होणार आहेत.

Advertisement

शनिवारी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली होती. प्रमुख डिफेंडर संदेश झिंगन गेल्या जानेवारीत सिरियाविरुद्ध झालेल्या आशिया कप साखळी सामन्यावेळी जखमी झाला होता. त्याच्या उजव्या गुडघ्याला ही दुखापत झाली होती. त्याला या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. पहिल्या यादीत जाहीर केलेल्या 26 खेळाडूंचे शिबीर भुवनेश्वर येथे 10 मे पासून सुरू होईल. दुसऱ्या यादीतील 15 खेळाडू 15 मे रोजी या शिबिरात दाखल होतील. या दुसऱ्या यादीत मुंबई सिटी एफसी व मोहन बागान एसजी संघांतील खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 41 खेळाडू या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होतील.

भारताची पहिल लढत कुवैतविरुद्ध कोलकाता येथे 6 जून रोजी होईल, त्यानंतर  11 जून रोजी होणाऱ्या कतारविरुद्धच्या लढती त्यांच्याच देशात खेळण्यासाठी भारतीय संघ प्रयाण करेल. गट अ मध्ये भारतीय संघ सध्या चार सामन्यांत 4 गुण घेत दुसऱ्या स्थानी आहे. गटामधील अव्वल दोन संघ राऊंड 3 साठी पात्र ठरणार आहेत. ही पात्रता मिळविणारे संघ 2027 मध्ये सौदी अरेबियात होणाऱ्या एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठीही पात्र ठरणार आहेत.

शिबिरासाठी निवडलेले दुसऱ्या यादीतील 15 संभाव्य फुटबॉलपटू : गोलरक्षक-फुरबा टेम्पा लचेन्पा, विशाल कैथ. डिफेंडर्स-आकाश मिश्रा, अन्वर अली, मेहताब सिंग, राहुल भेके, सुभाशिष बोस. मिडफिल्डर्स-अनिरुद्ध थापा, दीपक तांग्री, लालेंगमाविया राल्ते, लालियानझुआला छांगटे, लिस्टन कुलासो, सहल अब्दुल समद. फॉरवर्ड्स-मनविर सिंग, विक्रम प्रताप सिंग.

26 जणांच्या पहिल्या यादीत सुनील छेत्रीसह अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, अमेय गणेश राणावडे, जय गुप्ता, लालचुंगनुंगा, मुहम्मद हमाद, नरेंदर, निखिल पुजारी, रोशन सिंग नाओरेम, ब्रँडन फर्नांडिस, एडमंड लालरिंडिका, इम्रान खान, इसाक वनलालरुआतफेला, जॅक्सन सिंग, महेश सिंग नाओरेम, मोहम्मद यासिर, नंदकुमार सेकर, राहुल कनोली प्रवीण, सुरेश सिंग वांगजम, विबिन मोहनन, डेव्हिड लाल्हानसांगा, जितिन मदथिल सुब्रान, लालरिनझुआला, पार्थिब सुंदर गोगोई, रहीम अली यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.