कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोसम अनोख्या लग्नपत्रिकांचा

06:10 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लग्नाच्या मोसमात विविध प्रकारच्या लग्नपत्रिका काढल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. काही लग्नपत्रिका आश्चर्यकारक पद्धतीने रचलेल्या असतात. अशीच एक पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही आमंत्रण पत्रिका बिहारमधील एका लग्नसोहळ्याची आहे. ती सोशल मिडियावर प्रसिद्ध झाली असून लाखो लोकांनी पाहिली आहे. या पत्रिकेचा आशय अशा पद्धतीने मांडण्यात आला आहे, की ती चर्चेचा आणि विनोदाचा, अशा दोन्ही प्रकारांचा विषय बनली आहे.

Advertisement

Advertisement

लग्नपत्रिकेत वधू आणि वराची माहिती असते. ते किती शिकलेले आहेत, हे ही नमूद केलेले असते. या पत्रिकेवर वधू ‘टीआरई-4’ ची आवेदनकर्ती किंवा अर्जदार असल्याची माहिती आहे. याचा अर्थ असा की ती अद्याप शिक्षिका बनलेली नाही. मात्र, तिने शिक्षकभर्ती परिक्षेसाठी अर्ज केलेला आहे. वराच्या परिचयात तर याहीपेक्षा मजेशीर बाबी आहेत. वर ‘अकाऊंटंट प्रायव्हेट लिमिटेड’ असल्याचा उल्लेख आहे. याचा अर्थ वर एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अकाऊंटंट असावा, असा काढण्यात येत आहे. अशा प्रकारे इतर माहितीही विचित्र वाटणाऱ्या शब्दांमध्ये देण्यात आलेली आहे. आता ही विवाह पत्रिका सत्य आहे, की केवळ सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी टाकलेली आहे, यावर चर्चा होत आहे.

पत्रिकेवरचा दिनांक आणि मुहूर्त इत्यादींची पडताळणी केली असता, पत्रिका सत्य असल्याचे वाटते, असे अनेकांचे मत आहे. वधूने आपली शिक्षक भर्ती परिक्षेसाठी आवेदन पत्र किंवा अर्ज सादर केला आहे, अशी माहिती लग्नपत्रिकेवर नमूद करण्याचे कारण काय, हा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. टीआरई-4 ही प्रक्रिया बिहार लोकसेवा आयोगाने अद्याप हाती घेतलेली नाही. भविष्यात ही परीक्षा घेतली जाणार आहे. तरीही लग्नपत्रिकेवर ही माहिती देण्यात आली आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article