महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नीरज चोप्राचा सीझन बेस्ट थ्रो

06:58 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ल्युसाने डायमंड लीगमध्ये 89.49 मी भालाफेक : दुखापतीने त्रस्त असतानाही पटकावले दुसरे स्थान

Advertisement

वृत्तसंस्था/ ल्युसाने (स्वीत्झर्लंड)

Advertisement

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसला. ल्युसाने डायमंड लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करत नीरजने अवघ्या 14 दिवसातच पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने 89.45 मीटर भालाफेक केली होती, आता ल्युसाने डायमंड लीगमध्ये त्याने 89.49 मीटर भालाफेक करून स्वताच विक्रम मोडला. विशेष म्हणजे, नीरजचा हा मोसमातील सर्वोत्तम थ्रो ठरला. सर्वोत्तम थ्रोनंतरही नीरज लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90.61 मीटर अंतरावर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला.

ल्युसाने लीगमध्ये दुसरे स्थान पटकावल्यानंतर नीरज आता 5 सप्टेंबरपासून झ्युरिच येथे होणाऱ्या चौथ्या फेरीत सहभागी होणार आहे. डायमंड लीगच्या आतापर्यंत 3 फेऱ्या झाल्या आहेत आणि नीरजने 2 फेऱ्यामध्ये 14 गुण मिळवले आहेत. पॅरिसमध्ये आयोजित दुसऱ्या फेरीत नीरजने भाग घेतला नव्हता. दरम्यान, झ्युरिच लीग झाल्यानंतर डायमंड लीगच्या चार लीग सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी केलेल्या अव्वल 6 खेळाडूंमध्ये फायनल स्पर्धा होईल. ही स्पर्धा 13 किंवा 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स, बेल्जियम येथे होणार आहे. या स्पर्धेतून डायमंड लीगचा विजेता ठरवला जाईल.

ल्युसाने लीगमध्ये नीरजचा धमाका

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही दिवसातच नीरज डायमंड लीगच्या तिसऱ्या फेरीमध्ये सहभागी झाला. गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी ल्युसाने येथे डायमंड लीगचा तिसरा टप्पा पार पडला. दरम्यान, भालाफेक स्पर्धेत नीरजने मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान मिळविले. त्याने आपला ऑलिम्पिकचा विक्रम मोडत 89.49 मीटर भालाफेक केली, जो या हंगामातील त्याचा सर्वोत्तम थ्रो होता. पहिल्या पाच प्रयत्नात त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही पण सहाव्या प्रयत्नात त्याने आपला सर्वोत्तम थ्रो केला, परंतु तो 90 मीटरचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्याचा वैयक्तिक विक्रमही (89.94 मीटर) तोडू शकला नाही.

90 मीटरच्या लक्ष्यापासून पुन्हा दूर

ग्रेनेडाच्या पीटर अँडरसनने 90.61 मीटर भालाफेक करून पहिले स्थान पटकावले. जर्मनीचा ज्युलियन वेबर 87.08 मीटर भालाफेक करत तिसरा राहिला. नीरजने 89.49 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले. दरम्यान, या स्पर्धेतही नीरजला 90 मीटरचा टप्पा गाठता आला नाही. नीरज अनेक दिवसांपासून 90 मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आजतागायत त्याला यश आलेले नाही.

ल्युसाने डायमंड लीगमधील नीरजचे थ्रो

पहिला थ्रो - 82.10 मीटर

दुसरा थ्रो - 83.21 मीटर

तिसरा थ्रो - 83.13 मीटर

चौथा थ्रो - 82.34 मीटर

पाचवा थ्रो - 85.58 मीटर

सहावा थ्रो - 89.49 मीटर

डायमंड लीगच्या जेतेपदासाठी प्रयत्नशील

2010 पासून डायमंड लीग स्पर्धेला सुरुवात झाली. जगातील सर्वोत्तम 15 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असतात. डायमंड लीग वर्षातून चार ठिकाणी आयोजित केली जाते. या कार्यक्रमांचे आयोजन दोहा, पॅरिस, ल्युसाने आणि शेवटी झ्युरिच येथे केले जाते. नीरजने दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भालाफेक करून दुसरा क्रमांक पटकावला. पण 2024 च्या ऑलिम्पिकपूर्वी त्याने पॅरिस डायमंड लीगमध्ये फिटनेसच्या कारणास्तव भाग घेतला नव्हता. ल्युसाने लीगमध्ये दुसरे स्थान पटकावत त्याने 7 गुणाची कमाई केली आहे. आता नीरजकडे एकूण 14 गुण आहेत आणि एकूण गुणांच्या बाबतीत तो ज्युलियन वेबरसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसन पीटर्स 21 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर याकुब वेडलेच 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ज्युलियन वेबर आणि नीरज चोप्रा 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे, डबल ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या नीरजने 2022 मध्ये डायमंड लीगचे जेतेपद पटकावले आहे. गतवर्षी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा दमदार फॉर्ममध्ये असलेला नीरज डायमंड लीगचे जेतेपद पटकावणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article