महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सागर किनारी.....2)

06:34 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तरार्ध

Advertisement

अगदी ऑलिंपिकमध्ये आम्ही जे रीदमिक जिम्नॅस्टिक पाहतो ना त्याची अनुभूती या माशांना बघताना येते. या सगळ्या जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिकं हे डॉल्फिन मासे आम्हाला दाखवत असतात. एका लयीत पाच-पाच, सहा-सहा मासे अर्धवर्तुळाकार उडी मारून पुन्हा पाण्यात गडप होत होते. तर काही मासे उताणे पडून आपले पाठीवर पोहण्याचे कौशल्य दाखवत होते. मध्येच काही मासे आपली नाकासारखी बाजू वर आणून फुस असा आवाजही करत होते. समुद्राच्या मंचावरचा ऑपेरा बघावा असा हा कार्यक्रम. हे सगळं बघताना खूप मजा येत होती. हे सगळं नृत्य करणाऱ्या सगळ्या माशांची दिशा मात्र एकच ठरलेली त्यांचा पुढारी, म्होरक्या जिकडे जाईल तिकडे हे गट सरकत असतात. कारण हे गट नुसते उड्या मारत नसतात तर समुद्रातल्या  माशांना खाण्यासाठी निघालेले असतात. सकाळचा त्यांचा हा शाही ब्रेकफास्ट बघण्यासारखा असतो आणि मग या माशांच्या दिशांवरूनच बाकीच्या कोळी बांधवांनासुद्धा मासे असण्याच्या जागा निश्चित करता येतात. हे मासे अतिशय हुशार असल्यामुळे कधी कोळ्यांच्या जाळ्यात अडकतच नाहीत. कळपात राहणारा हा मासा आमची त्या दिवशीची सकाळ विलक्षण करून गेला. डॉल्फिन अतिशय वेगाने आता निघून खूप दूरवर दिसेनासे झाले होते. तरी आम्हाला समुद्राचं निरीक्षण करण्यात मजा येत होती. कारण आता या स्टेजवरती सूर्याची किरणे चमचम करत उतरायला लागली होती. आणि मग लक्षात आलं आता आकाशातले कलाकार, म्हणजे पांढरे शुभ्र पक्षी पंख पसरून खाली येतायत. विहरणं म्हणजे नेमकं काय? याचा तो एक सुंदर अनुभव तिथे येत होता. या पक्षांना बघायला जशी आम्ही माणसं जमली होतो तसे समुद्रातले छोटे छोटे मासेदेखील पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्याच माशांना पटकन टिपणारे हे पक्षी केव्हा क्षणार्धात खाली येत मासे उचलून पळून जात होते. हा खेळ बघण्यासारखा असतो. शेवटी निसर्गाचा नियम आम्हाला इथे प्रत्यक्ष बघायला मिळाला होता. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करताना कोणाच्या तरी खांद्यावर पाय ठेवावाच लागतो. वेळ आली तर डोक्यावर पाय देऊन म्हणजेच दुसऱ्याचं अस्तित्व संपून आम्ही पुढचा क्षण जगत असतो. याचा अनुभव या समुद्र दर्शनातून होत होता आणि जाणवत होतं. आपण माणसं तरी वेगळं काय करत असतो, जो सशक्त, आडदांड, रेटून बोलणारा असतो त्याची जगात चलती असते. रडणारा, कुढत बसणारा, अशक्त असा प्राणिमात्र बळीचा बकरा ठरतो. ज्याचं समर्थांनी एका वाक्यात वर्णन केलय ‘कोण पुसे अशक्ताला.’ आता आपण ठरवायचं असतं सशक्त की अशक्त बनायचं ते.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article