कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ मोबाईलसाठी कारागृहात शोध

12:43 PM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जयेश पुजारीच्या कारनाम्यांमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

Advertisement

बेळगाव : गुंड जयेश पुजारीवर एफआयआर दाखल झाल्यानंतर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचे कारनामे चव्हाट्यावर आले आहेत. कारागृहात सुखसोयी, मोबाईलवर बंदी असून कैद्यांना त्या सहजपणे कशा उपलब्ध होतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून जयेश बाह्या जगाच्या संपर्कात होता, तो फोन शोधून काढण्याचे आव्हान कारागृह प्रशासनासमोर आहे. कारागृहाच्या प्रभारी मुख्य अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश ऊर्फ जयेशकांत ऊर्फ शाकीरवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जयेशच्या कारनाम्यांबद्दल कारागृह प्रशासनाला माहिती दिली होती. त्यामुळे त्याचे धक्कादायक कारनामे उघडकीस आले आहेत.

Advertisement

नितीन गडकरी यांनाही खंडणीसाठी धमकावले होते 

दहशतवादी गटांच्या गळाला लागलेल्या जयेशची यापूर्वीही महाराष्ट्र एटीएस व एनआयएने चौकशी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून जयेशने खंडणीसाठी धमकावले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जयेशची गुन्हेगारीविषयक कुंडली तपासण्याचे काम तपास यंत्रणांनी केले होते. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी जयेशला स्थानबद्धतेत ठेवलेल्या बराकीत तपासणी केली असून त्याने वापरलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला आहे. मात्र तपासणीत मोबाईल आढळला नाही. नितीन गडकरी यांना धमकाविण्यासाठी वापरलेला मोबाईलही उशिरा ताब्यात घेण्यात आला होता. आता देशविघातक कारवायांत गुंतलेल्या गटांशी संपर्क साधण्यासाठी वापरलेला मोबाईल पोलिसांना ताब्यात घ्यावा लागणार आहे. एनआयएने जयेश कोणत्या क्रमांकावरून बाह्या जगाच्या संपर्कात होता, तो क्रमांक कारागृह प्रशासनाला कळविला आहे. त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात होता याचा तपशील मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article