कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृष्णेत उडी घेतलेल्या तरूणीचा शोध सुरूच

11:58 AM Jul 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

सव्वीस वर्षीय तरुणीने सोमवारी रात्री कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून थेट नदीत उडी घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. अद्यापही संबंधित तरुणीचा थांगपत्ता लागलेला नाही. दरम्यान तरूणीचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता आणि ती विवाहाच्या उंबरठ्यावर असतानाच तिने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत तिचा शोधण्याचे काम सुरू होते.

Advertisement

कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26, सध्या रा. वाखाण रोड, कराड, मूळ रा. जत, जि. सांगली) असे या तरुणीचे नाव आहे. दरम्यान तरूणीने नदीत उडी टाकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफ टीमसह कराड नगरपरिषद अग्निशामक दल आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या समन्वयातून शोधकार्य मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरू होते.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना ही कराडच्या एका रूग्णालयात नोकरी करते. सोमवारी रात्री दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. पुलावर अंधार असल्याने ती दुचाकी रस्त्याकडेला उभा करून काही वेळ ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असल्याचे ये जा करणाऱ्यांनी पाहिले. पुलावर चालण्यासाठी मार्ग असल्याने अनेकजण त्या परिसरात चालत असतात. युवती फोनवर बोलत असताना अचानक तिने नदीत उडी मारल्याचे काहींनी पाहिले. त्यांनी आरडाओरड केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू माळी, गुन्हे प्रकटीकरणचे अशोक भापकर, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सज्जन जगताप, धीरज कोरडे, मुकेश मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दी पांगवत तरूणीने उडी घेतलेल्या ठिकाणी तपासणी सुरू केली. पुलावर कल्पनाची दुचाकी आणि तिची सॅक आढळून आली.

सॅकमधील ओळखपत्र, पर्स पाहून तरूणीची ओळख पटली. तिचे नाव कल्पना वाघमारे असल्याचे समोर आल्यावर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच आईवडिलांसह इतर नातेवाईक जमा झाले. पोलिसांनी तरूणीची सॅक नातेवाईकांना दाखवल्यावर त्यांनी तरूणीची ओळख पटवली. ओळख पटताच तिच्या आईने आक्रोश केला तर वडीलही सुन्न झाले होते. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. स्थानिक मच्छीमारांचीदेखील मदत घेण्यात आली. मात्र, अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर अपवाद वगळता पावसाची संततधार सुरू होती. यातच कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा कोयना नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे मदतकार्यात गुंतलेल्या पथकांना प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने नेमके काय झाले असावे, यासंदर्भात अंदाज बांधता येत नव्हता.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article