For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेलंगणात 6 हमी योजनांवर शिक्कामोर्तब

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
तेलंगणात 6 हमी योजनांवर शिक्कामोर्तब
Advertisement

नूतन रेवंत रेड्डी सरकारची मान्यता : मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध : अन्य 11 मंत्र्यांनाही खाती बहाल

Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

Advertisement

काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवार, 7 डिसेंबर रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत 11 मंत्र्यांनीही एलबी स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेतली. त्यापैकी भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. मंत्रिगण शपथबद्ध झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत नवनिर्वाचित सरकारने सहा हमी योजनांवर शिक्कामोर्तब केले आहे. या योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. राज्यात काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर रेवंत रे•ाr यांचा शपथविधी सोहळा एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वधेरा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुख्य उपस्थितीसह हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने शपथसोहळा पार पडला. याप्रसंगी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित होते. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदराजन यांनी रेवंत रे•ाr आणि इतर मंत्र्यांना शपथ दिली. शपथविधीपूर्वी एलबी स्टेडियमबाहेर लोककलाकारांनी कार्यक्रमही केले.

तेलंगणाची स्थापना 2014 मध्ये झाली. तेव्हापासून 2023 पर्यंत भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होते. यावषी झालेल्या विधानसभा निवडणुकीत केसीआर यांचा पराभव झाल्यानंतर राज्याला रेवंत रे•ाr यांच्या रूपाने दुसरे (कार्यकाळाच्या दृष्टीने तिसरे) मुख्यमंत्री मिळाले. रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दोन फायलींवर सह्या केल्या. पहिली फाईल काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या 6 हमीभावांची होती. दुसऱ्या फाईलमध्ये अपंग महिलेला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या ‘प्रगती भवन’बाहेर लावलेले कुंपण पाडण्याची मोठी कारवाई केली आहे. या कुंपणामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

मंत्रिमंडळ खातेवाटप

रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील तेलंगणाच्या नव्या मंत्रिमंडळात अन्य 11 जणांना शपथ देण्यात आली आहे. त्यापैकी उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे गृह मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच कोमटी व्यंकटा रेड्डी - म्युनिसिपल, श्रीधर बाबू - अर्थ, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी - सिंचन, कोंडा सुरेखा - महिला कल्याण, भट्टी विक्रमार्क - महसूल, दामोदर राजनरसिंह - वैद्यकीय आणि आरोग्य, जुपल्ली कृष्ण राव - नागरी सेवा, सीताक्का - आदिवासी कल्याण, थुम्माला नागेश्वर राव - रस्ते आणि गृह निर्माण असे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. पोन्नम प्रभाकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला असला तरी त्यांच्या खात्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

खुर्चीचा ताबा घेताच ‘बुलडोझर’ कारवाई

मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच रेवंत रेड्डी यांनी बुलडोझरची कारवाई सुरू केली आहे. बुलडोझरची पहिली कारवाई मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरच झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरील कुंपण तोडण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बांधलेल्या कुंपणामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे लोकांची अडचण होत होती. या कारवाईच्या माध्यमातून राज्यातील जनतेला त्यांनी अतिक्रमण किंवा अवैध बांधकामांवर कठोर कारवाईचा संदेश दिला आहे.

तेलंगणावासियांसाठीच्या काँग्रेसच्या 6 हमी योजना...

  • महालक्ष्मी योजना : महिलांना दरमहा 2,500 रुपये आणि 500 ऊपयांना गॅस सिलिंडर. तसेच राज्य परिवहन टीएसआरटीसी बसमध्ये मोफत प्रवास.
  • राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी 15 हजार ऊपये आणि शेतमजुरांना 12 हजार ऊपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन.
  • ज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज.
  • इंदिरम्मा इंदलू योजना : ज्या कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही त्यांना घरासाठी जमीन आणि 5 लाख ऊपयांची आर्थिक मदत देणार.
  • युवा विकास योजना : विद्यार्थ्यांना 5 लाख ऊपयांची मदत. याचा वापर विद्यार्थी महाविद्यालयाची फी भरण्यासाठी करू शकतील.
  • चेयुथा योजना : वृद्ध आणि दुर्बल घटकांना 4,000 ऊपये पेन्शन देणार.
Advertisement
Tags :

.