For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘व्हिएनार’चे व्हिला तीन दिवसांत सील करा

12:02 PM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘व्हिएनार’चे व्हिला तीन दिवसांत सील करा
Advertisement

2.77 कोटींची नुकसान भरपाई फेडावी : गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश,हणजुण व्हिला भाड्याने दिल्याचे प्रकरण

Advertisement

पणजी : बार्देश तालुक्मयातील हणजूण येथे ‘व्हिएनार कंपनी’कडून 27 व्हिलांचे संकुल बांधण्यात आले आहे. हे व्हिलाज व्यावसायिकरित्या भाड्याने दिले जात असून त्यांना कोणताही व्यावसायिक परवाना नाही. तसेच एवढ्या भव्य संकुलात सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पही उभारण्यात आलेला नाही. यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई करताना पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी 2. 77 कोटी ऊपयांची नुकसान भरपाई फेडण्याचा, तसेच सदर व्हिलाज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश दिले आहेत. हणजूण येथे सेबेस्तियनवाडा येथे ‘ला ओलालियन’ आणि ‘ला ओरिला’ नावाचे मोठे आलिशान बंगल्यांचे संकुल बांधण्यात आले आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शर्मिला मोंतेरो यांनी काल सोमवारी हा आदेश जारी  केला आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, न्याय दंडाधिकारी, पर्यटन खात्याचे संचालक, मुख्य नगरनियोजक, आरोग्य अधिकारी आणि हणजूण ग्राम पंचायत सचिवाला हा आदेश कळवण्यात आला आहे.

रिटा रॉड्रिगीज यांची तक्रार

Advertisement

याप्रकरणी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक रिटा रॉड्रिगीस यांनी मंडळाकडे केली होती. या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट 2022 रोजी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागेची पाहणी केली असता, त्यांना सार्वजनिक गटारात खुल्या पद्धतीने पाइपद्वारे सांडपाणी सोडले जात असल्याचे आढळून आले होते. या पूर्ण संकुलासाठी फक्त दोन सेप्टिक टँक वगळता सांडपाण्यासाठी अन्य कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, हे पाहणीत उघड झाले होते.

प्रत्यक्ष पाहणीत झाला पर्दाफाश

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष पाहणीत या संकुलात थोडे थोडके नव्हे, तर चक्क 31 भव्य व्हिलाज बांधण्यात आले असून ते श्रीमंत पर्यटकांना वाढीव दाम घेऊन भाडेतत्वावर दिल्याचे उघड झाले. मात्र त्यासाठी पर्यटन खात्याकडून तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाना घेतला गेला नव्हता. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. यातील फक्त चारजण वगळता अन्य 27 मालक दर महिना लाखो रुपये कमावत असले तरी आरोग्य आणि पर्यावरणकडे कानाडोळा करत असल्याचे आढळून आले होते.

‘व्हिएनार कंपनी’चे पितळ पडले उघडे

या भव्य संकुलात नियमानुसार, कोणताही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष पाहणीनंतर मंडळाने व्हिएनार कंपनीला करणे दाखवा नोटीस पाठवली. त्यावर दोनवेळा नोटिशीला उत्तर देताना या संकुलात फक्त आठ व्हिलाज असून ते राहण्यासाठी खरेदी करण्यात आल्याने त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे खोटे उत्तर देण्यात आले. या बंगल्याचे स्वतंत्र मालक असून सांडपाणीबाबत प्रक्रिया करण्याची जबाबदारी या मालकांची असून कंपनीची नसल्याचे कारण देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अखेर अखेर कंपनीचे पितळ उघडे पडल्याने मंडळाने या कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Tags :

.