महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदलाची दहशतीने मोडली सागरी चाचेगिरी

11:41 AM Sep 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सागरी मार्गाने देशाचा 90 टक्के तर जगाचा 70 टक्के व्यापार आजघडीला सुऊ आहे. सागरी मार्गाने व्यापार करायचा म्हणजे समुद्री चाच्यांचा मोठा उपद्रव सुऊ असतो. खास कऊन एडनच्या आखाताजवळ सोमाली चाच्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे चाचे सातत्याने व्यापारी जहाजांना लक्ष्य करीत असून त्यामुळे समुद्री मालवाहतूक धोक्यात आल्याने भारतीय नौदलाने डोळ्यात तेल घालून त्या भागात गस्त सुरू केली आहे. याचदरम्यान डिसेंबरपासून सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेल्या ‘एमव्ही ऊएन’ या माल्टा देशाच्या व्यापारी जहाजावरील चाच्यांचा नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ या अत्याधुनिक युद्धनौकेने 40 तास सामना करीत चाच्यांना ताब्यात घेतले. यामुळे सागरी चाच्यांनी नौदलाची मोठी दहशत घेतली आहे.

Advertisement

समुद्रावर ज्याचे वर्चस्व त्याचे सर्व जगावर वर्चस्व. असा ठाम दावा करीत ब्रिटीशानी संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविले. आजही जगात ब्रिटीशांचे नौदल हे रॉयल (श्रीमंत) नौदल म्हणून ओळखले जाते. सागरी मार्गाने व्यापार हा स्वस्त आणि सोयीस्कर असल्याने, आज अनेक जहाज कंपन्या या मार्गाचा वापर करीत आहेत. भर समुद्रातून अहोरात्र प्रवास करत इच्छीतस्थळी या जहाज कंपन्यांचा व्यापार सुऊ आहे. मात्र या व्यापारावर देखील डल्ला मारण्याचे काम सागरी लुटेरे पूर्वापार करीत आहेत. यामुळे प्रत्येक व्यापारी जहाजावर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. म्हणजेच अशा प्रकारचा काही धोका दृष्टीपथात दिसत असल्यास तत्काळ मदतीसाठी संदेश देऊ शकता जेणेकऊन जवळ असलेले कोणत्याही देशाचे नौदल तत्काळ मदतीला धावते. अशा प्रकारच्या अनेक कारवाया भारतीय नौदलाने  करीत या सागरी चाच्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे सागरी चाच्यांनी नौदलाची चांगलीच दहशत घेतली आहे.

Advertisement

अलीकडच्या वर्षांत आफ्रिकेचा पश्चिम किनारा, एडनचे आखात, हॉर्न ऑफ आफ्रिका, बांगलादेश आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीवर समुद्री चाच्यांनी हल्ले केले आहेत. खरे तर चाचेगिरी हे बेकायदेशीर कृत्य आहे. या सागरी भागात पोलीस बंदोबस्त कमी असून, किनारी देशांकडे असलेले सागरी सैन्यही कमकुवत आहे, तर काही देशांकडे अजिबात नाही. या भागात सामान्यत: जहाज वाहतुकीचे पेंद्रीकरण असते, एकतर जहाजांच्या मार्गावरील चेक पॉईंट असतात, तिथे जहाजांना एकत्र यावे लागते, तर काहींना बंदरात लगेचच प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे जहाजांना समुद्रातच राहावे लागते. या भागांच्या जवळच्या जमिनीवर अनेकदा खराब प्रशासन किंवा अशांतता असते, त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्या आणि परिणामी गुन्हेगारी वाढते. हे क्षेत्र बहुतेक आंतरराष्ट्रीय जल, आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी किंवा द्वीपसमूहाच्या मधोमध असते, त्यामुळे तिथे अनेक देशांच्या सागरी सीमा अधिकारक्षेत्रावरून वाद असतात. नेमका याचाच फायदा सागरी चाचे घेत त्यांचे इप्सीत साध्य करीत आहेत.

वास्तविक पाहिले तर हे सर्व सागरी लुटेरे सोमालियाचे आहेत. नौदलाच्या दहशतीने हे कधी भर समुद्रात फिरताना दिसत नाहीत. मात्र अचानक यांची सर्व फौज समुद्रात उतरते. अशावेळी अनेक जहाजे त्यांच्या टार्गेटवर असतात. यावेळी जहाजावरील खलाशाना वेठीस धरणे आणि जहाज मालकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचे हे काम करतात. अनेकदा तर ते संबंधीत देशाच्या सरकारला देखील वेठीस धरतात. अशाच प्रकारे सोमालियाच्या आखातात गेले अनेक वर्षांपासून निक्रिय असलेल्या समुद्री चाच्यांनी अचानक डोके वर काढले होते. बल्गेरिया देशाच्या व्यापारी जहाजासह त्यावरील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेऊन जहाज कंपनीकडे 60 हजार अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागण्यात आली होती. 269 सागरी मैल समुद्रात भारतीय नौदलाने 40 तास

ऑपरेशन राबवून या समुद्री चाच्यांना 35 सोमालियन चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. यावर्षी सुरूवातीला सोमाली चाच्यांनी ‘स्पीड बोटी’ मधून बल्गेरियन देशातील ‘एव्ही ऊएन’ या मालवाहू जहाजाचा मार्ग रोखला. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी आसपास असलेल्या युद्धनौका अथवा पाणबुड्यांना आपत्कालिन संदेश पाठविला खरा, मात्र जहाजाच्या आसपास कुणीही नसल्याने त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. अखेर चाच्यांनी जहाजावर प्रवेश मिळवला व हवेत गोळीबार केला.

जहाजाचा कप्तान आणि द्वितीय अधिकाऱ्याला ओलीस ठेवण्यात आले. या जहाजावर 17 हून अधिक कर्मचारी होते. त्यात सात बल्गेरियन देशातील नागरिकांचा समावेश होता. या जहाजावर 37 समुद्रे चाचे होते. त्यांनी जहाज कंपनीकडे 60 हजार अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती. जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्ग असलेल्या सोमालीयन आखात परिसरात अनेक वर्षानंतर समुद्री चाच्यांनी पुन्हा डोके वर काढले होते. सोमालियन चाच्यांनी 10 वर्षांपूर्वी मोठा हैदोस घातला होता. जागतिक व्यापारावर त्याचा परिणाम पहायला मिळत होता. त्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून अपहरणाच्या 20 पेक्षा जास्त घटना घडल्या असून त्यामुळे सुरक्षा व विम्याचा खर्च भरमसाट वाढला. आपली जहाजे सोडवून घेण्यासाठी कंपन्यांना खंडणीही मोजावी लागत असल्यामुळे खर्चात भर पडली आहे. 2008 ते 2014 या काळात सोमाली चाच्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यावळी अद्याप तशी परिस्थिती नसली, तरी चाच्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर ही समस्या वाढण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना वेळीच धडा शिकवण्याची आवश्यकता होती. भारतीय नौदलाने या अपहरणावर कारवाईची मोहिम मार्च महिन्यात हाती घेतली. सुमारे 40 तास चाललेल्या या कारवाईत नौदलाच्या आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा युद्धनौका, ड्रोन आणि सागरी कमांडो सहभागी झाले होते.

नौदलाच्या मार्कोस कमांडो या मोहिमत सहभागी झाले होते. मार्कोस कमांडोंनी या अपहरण केलेल्या व्यापारी जहाजावर चढून कारवाई करून समुद्री लुटाऊंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. नौदलाची ही मोहीम सुमारे 40 तास सुरू होती. या काळात चाच्यांनी भारतीय जवानांवर अनेकवेळा गोळीबारही केला. या महत्त्वपूर्ण बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकातावरील 35 समुद्री चाच्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच या व्यापारी जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणात दोन अन्य आरोपींचा सहभाग असून त्यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी बल्गेरियाचे जहाज ओलीस ठेवून जहाज कंपनीकडे 60 दशलक्ष डॉलर्सची खंडणी मागितली होती. या प्रकरणात दोन पांढऱ्या बोटी, तीन इंजिन, 9 मोबाइल फोन, 196 जिवंत काडतुसे, 1 डाऊन केस, 1 चाकू, 1 सोनी

कॅमेरा, सोमालीचे एक पारपत्र, बल्गेरियाची दोन पारपत्रे, ओळखपत्रासह इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. 35 सोमालियन चाच्यांविऊद्ध भादंविसह बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए), मेरिटाईम अॅन्टी पायरसी अॅक्ट, पारपत्र कायद्याअंतर्गत मुंबईतील येलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नुकतीच सर्व आरोपींविरोधात चार हजार पानांचे आरोपपत्र दाखल दाखल करण्यात आले. समुद्री चाच्यांना पकडण्यासाठी कारवाईत सहभागी नौदलाच्या अधिकाऱ्यांसह 70 जणांचे जबाब या आरोपपत्राचा भाग आहे. मुंबई पोलिसांनी नौदलाच्या मदतीने सोमालियन चाच्यांविरोधात कायदेशीर कारवाईही पूर्ण केली होती.

 -  अमोल राऊत 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article