महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाविरोधात एसडीपीआयचे आंदोलन

10:32 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाविरोधात शुक्रवारी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. किल्ला तलाव येथे मानवी साखळी करण्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार अल्पसंख्याक मुस्लीम समाजावर बंधने आणण्याचा प्रयत्न करीत आहे. वक्फ बोर्डचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न 2019 पासून सुरू आहे. वक्फ बोर्डच्या विरोधात देशभर चुकीची माहिती पसरविली जात आहे. वक्फ बोर्डच्या जागा तसेच मालमत्तांबाबत चुकीची माहिती देऊन देशात विरोधी वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे या विरोधात मुस्लीम संघटनांनी आंदोलन करत वक्फ बोर्डच्या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी किल्ला तलाव येथे मानवी साखळी तयार करण्यात आली. त्यानंतर शेकडोच्या संख्येने एसडीपीआय कार्यकर्ते संगोळ्ळी रायण्णा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. केंद्र सरकारविरोधात घोषणा देत वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article