शिल्पकारांनी साकारले व्यक्तीशिल्प
कोल्हापूर :
शिल्पकार संजीव संकपाळ आणि सिमा खेडकर यांनी हुबेहब व्यक्ती शिल्प साकारून सर्वांची मने जिंकली. तर अनेक शिल्पकारांनी शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे शिल्प साकारून विद्यापीठ परिसराचे लक्ष वेधून घेतले. विद्यापीठाच्या बॅ. ााळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात शिल्पकार शिल्प साकारण्यात व्यस्त होते. त्यांनी शिल्पकारांनी साकारलेल्या शिल्पातून त्यांच्यातील कौशल्य अनुभवले. ही शिल्पे पाहण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्व. शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या कलेच्या स्मृती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि नवशिल्पकार व कलाकारांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला. शिल्पकार बी. आर. खेडकर यांची कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ यांनी प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवराज कुंभार यांनी बी. आर. खेडकर यांची यशोगाधा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. अमृत अब्दागिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोट्रेट साकारले. रोहन कुंभार व शितल पाटील यांनी क्रियेटीव्ह शिल्प साकारले. आकाश कुंभार यांनी दिवंगत शिल्पकार बी. आर. खेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे निरीक्षण करतानाचे पोट्रेट साकारले.
विराज कुंभार आणि कुणाल कुंभार, अभिनंदन कुंभार यांनी कंपोझिशन प्रकारातील शिल्प साकारले. प्रिती पुरोहित यांनी मोराचे तर श्रीकांत कुणाळकर यांनी रिलीफ शिल्प साकारून उपस्थितांची मने जिंकली. प्रज्वल कुंभार यांनी लेडी फिगर साकारली. तसेच मन्वीत कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व प्रथमेश सिध्दार्थ यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प साकारले. सुरज पुरेकर यांनी पक्षांचे शिल्प साकारले. तर प्राजक्ता बनसोडे व करण कुंभार, शुभम कुंभार, वरद कुंभार यांनी उठीव शिल्प साकारले. दिनकर कुंभार यांनी गणपतीची आकर्षक मुर्ती साकारली होती. सतीश वडणगेकर यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प साकारून आपल्या कलेतील वेगळेपण दाखवून दिले. शिल्पकलाकारांचे कौशल्य दिसतेच परंतू तीन तास एका ठिकाणी बसून शिल्प साकारण्यासाठी बसणाऱ्या मॅडेलचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
- या कलाकारांचा पारितोषिक देवून गौरव
कार्यशाळेतील यश कुंभार यांच्या शिल्पाला प्रथम क्रमांकाला 2000, दर्शन मिस्त्री यांच्या शिल्पाला व्दितीय क्रमांकाला 1000 आणि रोहन कुंभार यांच्या शिल्पाला तृतीय क्रमांकाला 500 रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते पारितोष्घ्कि वितरण समारंभ पार पडला.