महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मामांचा वारसा पुढे नेणारे मूर्तीकार सुनील मडकईकर

12:54 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कलाकारांचे स्मरण रहावे हा हेतू, पारंपरिक मूर्तीकला टिकून राहण्यासाठी सरकारचे प्रयत्न, प्रत्येक कलाकाराला एका मूर्तीसाठी 300 ऊपये अनुदान

Advertisement

मडकई : गणेश चतुर्थी अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्याने चित्रशाळांमध्ये मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. मडकई येथील मूर्तीकार सुनिल दत्ता मडकईकर हे आपल्या मामांचा वारसा पुढे  नेत असून यांच्या  चित्रशाळेत गणपतीच्या मूर्तीची लगबग सुऊ आहे. पंचाहत्तर वर्षापेक्षाही अधिक जुन्या अशा या चित्रशाळेचा वारसा मडकईकर हे  पुढे नेते आहेत. ज्या कलाकारांनी तऊण वयात जीव ओतून ही कला जोपासली, त्यांचे स्मरण नवीन पिढीला व्हावे, या उदात्त हेतूने सुनिल मडकईकर यांनी मूर्ती घडविण्याचे काम सुऊ ठेवले आहे. गेली 46 वर्षे ते ही पंरपरा पुढे चालवत आहेत. गणेश चतुर्थी हा गोव्यातील हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा सण आहे.  गणपतीच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांची मांदियाळी पुष्कळ आहे. कलेच्या संर्वधनाबरोबर उत्कृष्ट विचार व ध्येय ठेऊन दिवंगत गुरुंच्या स्मरणाप्रित्यर्थ गणपतीची चित्रशाळा चालवणे व कुठल्याच परिस्थीतीत ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी झटणारे सुनिल मडकईकर यांच्या कार्याची स्तूती करावी लागेल. देवी नवदुर्गेच्या चरणांशी ही गणपतीची चित्रशाळा असून तिचा वरदहस्त या शाळेला लाभलेला आहे. मूर्तीकार सुनिल मडकईकर हे पोस्टमास्टर म्हणून म्हार्दोळ येथे कामाला होते. आवड म्हणून बालपणी या शाळेतून त्यांनी आपले मामा स्व. मोहनदास मडकईकर यांच्याकडून मूर्तीकला शिकून घेतली. मोहनदास मडकईकर यांनी अथक मेहनतीने उभ्या  केलेल्या या गणपतीच्या चित्रशाळेत त्यांच्या आठवणी दाटलेल्या आहेत. या स्मृती कलेच्या माध्यमातून प्रवाहीत ठेवाव्यात म्हणून त्यांच्याकडून शिकलेली कला पुढे नेते असल्याचे सुनिल मडकईकर सांगतात.

Advertisement

मामांच्या कलेचा वारसा जीवंत ठेवला, याचा अभिमान त्यांनी बाळगलेला आहे. सुरुवातीला या चित्रशाळेत शंभरच्या आसपास मूर्ती घडविल्या जात. पैशांच्या हव्यासापोटी केवळ मूर्ती तयार करण्याचे आपण काम केले नाही, तर त्या कलेत प्राण ओतून प्रत्येक मूर्तीमध्ये चैतन्य कसे येईल, हा दृष्टीकोन समोर ठेऊन काम केले. त्याचे फलीत म्हणून आज हा आकडा तिनशेंपर्यंत पोहोचला आहे. देवी नवदुर्गेच्या चरणांशी असलेली कला वृद्धींगत करण्यासाठी याच गावातील माणसे आणून मूर्तींवर कामे करीत आहे. संदीप नाईक, सुरेश गावडे, साईनाथ गावडे, मोहन महाले, सोहन महाले, गिरेश धामस्कर हे मित्र येऊन त्यांना मदत करीत आहेत. माती काढण्यापासून सर्व कामे त्यांच्याकडून होत आहेत. मात्र गणपतीची रेंखणी केवळ ते स्वत: करीत असतात. माती काढण्यासाठी अद्ययावत यंत्रे उपलब्ध झाली आहेत. 40 हजार ऊपये खर्चून माती काढण्याचे यंत्र आणले आहे. रंगकामासाठीही मशिनचा वापर केला जात आहे. त्यामुळे एकेकाळी होणारे कष्ट कमी झाले आहेत. त्यावेळी पेडणे तालुक्यात जाऊन शेतातील माती खणून काढावी लागत होती.   लहान मुले बालपणी अनेक गोष्टी करीत असतात. वडिलधाऱ्या माणसांनी त्यांना दटावू नये. कारण त्यातूनच छंद अथवा कला दडलेली असते. वडील दत्ता मडकईकर यांना या कलेचा गंधही नव्हता.मातीत हात घालून गमतीने मूर्ती घडविण्याच्या कलेला मामा व वडिलांनी हरकत न घेता प्रोत्साहन दिले म्हणून आज कलाकार म्हणून समाजात उभा आहे, असे ते सांगतात.

पारंपरिक मूर्तीकला जीवंत राहावी यासाठी सरकारही प्रयत्न करीत आहे. कलाकारांना त्यासाठी अनुदान दिले जाते. हस्तकला महामडळांकडून मिळणाऱ्या या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी एका गणपतीमागे शंभर रुपये आर्थिक साहाय्य दिले जायचे. यंदाच्या वर्षापासून तिनशे ऊपये मिळणार आहेत. तेवढा आधार कलाकारांना मिळतो, यातच ते समाधानी आहेत. मात्र सरकार देत असलेले अनुदान एका वर्षानंतर मिळत असते. त्यात जर बदल करुन चतुर्थीच्याच काळात हे अनुदान देण्याची व्यवस्था केल्यास कलाकारांना ते जास्त सोयीचे होईल, असे सुनिल मडकईकर सांगतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article