For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कॉटलंडची नामिबियावर मात

06:12 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कॉटलंडची नामिबियावर मात
Advertisement

वृत्तसंस्था/ बार्बाडोस, वेस्ट इंडिज

Advertisement

शुक्रवारी रात्री उशिरा नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यात विश्वचषक सामना रंगला. स्कॉटलंडने हा सामना 5 विकेटने जिंकला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हलवर नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाने 20 षटकांत 9 बाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडने विजयी लक्ष्य 18.3 षटकांत 5 गडी गमावत पूर्ण केले. कर्णधार रिची बेरिंग्टनने सर्वाधिक 47 धावांची नाबाद खेळी केली. स्कॉटलंडचा नामिबियावरचा हा पहिला टी-20 विजय ठरला. दरम्यान, याआधी झालेले तीनही टी-20 सामने नामिबियाने जिंकले होते. ब गटात स्कॉटलंडचा संघ तीन गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहे. दरम्यान, 17 चेंडूत 35 धावा व एक बळी मिळवणाऱ्या स्कॉटलंडच्या मायकेल लीस्कला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.