लाकडाने तयार करतात स्कूटर
किमत जाणून घेतल्यावर धक्का बसेल
सद्यकाळात वाहनांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. स्कूटर देखील 1 लाखापेक्षा अधिक किमतीत मिळू लागली आहे. इलेक्ट्रिक बाइक्स असो किंवा स्कूटर त्यांची किंमत लाखोच्या घरात आहे. परंतु जगात एक ठिकाणी इतकी स्वस्त स्कूटर मिळते की त्याची किंमत जाणून घेतल्यावर तुम्ही त्वरित ती खरेदी करू पहाल. परंतु ही स्कूटर लाकडाद्वारे तयार केली जाते आणि ती देखील पेट्रोल आणि डिझेलशिवाय चालविली जाते.
या स्कूटरला चुकुडू म्हटले जाते आणि रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ती निर्माण केली जाते. ही लाकडी स्कूटर स्थानिक लोक तयार करतात आणि विकतात. या स्कूटरचा येथे मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तेथे रस्त्यावर जवळपास प्रत्येक जण ही लाकडी स्कूटर चालविताना दिसून येतो.
अत्यंत स्वस्त
ही स्कूटर अत्यंत मजबूत असते आणि ती अत्यंत मेहनतीने तयार केली जाते. अनेक लोकांनी स्वत:चे वडिल आणि आजोबांकडून या स्कूटरच्या निर्मितीची कला शिकलेली आहे. ही स्कूटर केवळ 100 डॉलर्स (8 हजार रुपये) मध्ये मिळते. यामुळे ही खरेदी करणे लोकांकरता सोपे आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी, पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीचा वापर होत नाही. ही स्कूटर पायांनी धक्का देत चालविली जाते. सामान वाहून देण्यासाठी किंवा लोकांच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी ही स्कूटर अत्यंत उपयुक्त आहे.
निर्मिती अत्यंत अवघड
स्कूटर निर्मितीसाठी सर्वप्रथम लाकडाच्या विविध हिस्स्यांना निर्माण केले जाते आणि मग या हिस्स्यांना परस्परांमध्ये जोडले जाते. लाकडाद्वारेच टायर तयार केला जातो. ज्यानंतर चामड्याद्वारे त्याचा बाहेरील हिस्स तयार करत खिळ्यांद्वारे तो लाकडी टायरला जोडण्यात येतो. काँगोच्या एका शहरात या स्कूटरची प्रतिकृतीही निर्माण करण्यात आली आहे.