शुक्र ग्रहावर वैज्ञानिकांनी शोधले पाणी
शुक्र ग्रहावरील ढग नेहमीच वैज्ञानिकांसाठी रहस्य ठरले आहेत. तेथे जीवसृष्टी असू शकते हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता अमेरिकेच्या वैज्ञानिकांच्या एका टीमने 50 वर्षे जुन्या डाटाची पुनर्तपासणी केली असता शुक्राचे ढग प्रामुख्याने पाण्याने तयार झालेले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे पाणी स्वच्छ थेंबांमध्ये नव्हे तर हायड्रेटेड सामग्रीच्या स्वरुपात अस्तित्वात आहे. ढग हे मोठ्या प्रमाणात सल्फ्यूरिक अॅसिडने निर्माण झाल्याची जुनी धारणा होती. परंतु पाण्याचा हिस्सा 62 टक्के असल्याचे आता कळले आहे. हा शोध नासाच्या पायनियर मिशनच्या जुन्या आकडेवारीतून लागला आहे.
पृथ्वीसारखी स्थिती, परंतु रहस्यमय
शुक्र सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. याचे वातावरण अत्यंत तप्त आणि विषारी आहे. पृष्ठभागावर तापमान 460 अंशापर्यंत पोहोचते, परंतु त्यावरील ढगांचे आवरण, तेथील दबाव आणि तापमान पृथ्वीसारखेच आहे. सुमारे 50 अंश सेल्सिअस आणि सामान्य हवेचा दबाव असल्याने तेथे सुक्ष्मजीवन असू शकते, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
ढग सल्फ्यूरिक अॅसिडने निर्मित असल्याचे पूर्वी मानले जायचे, हे अॅसिड अत्यंत विषारी असल्याचे जीवनाची कल्पनाही करणे अवघड होते. पाण्याची कमतरता मोठा अडथळा होता, आता नव्या अध्ययनानुसार पाणी अत्यंत अधिक असून ते हायड्रटेड स्वरुपात बांधलेले आहे.
जुन्या डाटातून शोध
हा शोध कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक स्टेट युनिव्हर्सिटी (कॅल पॉली पॉमोना), विस्कॉनिन्स युनिव्हर्सिटी, एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी आणि नासाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. डॉ. राकेश मोगुल (कॅल पॉली पॉमोना) आणि डॉ. संजय लिमये (विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी) यांचा यात मोठा भाग होता. 1978 च्या नासा पायनियर व्हिनस मिशनचा डाटा पुन्हा पाहण्याचा विचार त्यांनीच मांडला होता. पायनियर व्हिनस मिशनमध्ये एक मोठा प्रोब (साउंडर) शुक्राच्या वातावरणात उतरला होता, त्यावर न्यूट्रल मास स्पेक्ट्रोमीटर (एलएनएमएस) आणि गॅस क्रोमॅटोग्राफ (एलजीसी) ही दोन उपकरणे होते. गॅसचे मापन करण्यासाठी ही उपकरणे वापरली जातात. परंतु डाटा नासाच्या आर्काइवमध्ये मायक्रोफिल्म्समध्ये होता, प्रथम याला डिजिटाइज करावे लागले.
उपकरणांच्या ‘जाम’द्वारे रहस्याची उकल
प्रोब जेव्हा ढगांच्या मोठ्या हवेत उतरला, तेव्हा उपकरणांचे इनलेट (छिद्र) ढगांच्या कणांमुळे जाम झाले. यामुळे सीओ2चा स्तर अचानक कमी झाला, प्रथम याला बिघाड मानले गेले, परंतु आता याला संधी मानण्यात आले. प्रोब खाली उतरत गेला, उष्णतेने कण वितळले, वेगवेगळ्या तापमानावर वेगवेगळे वायू निघाले, यातून कण कशाने तयार झाले हे कळू शकले.
पाण्याचे मोठे अस्तित्व : 185 अंश आणि 414 अंशावर पाण्याचे मोठे प्रमाण निघाले. हे हायड्रेटेड फेरिक सल्फेट आणि हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फेटसारख्या यौगिकांद्वारे आले. एकूण कणांच्या 62 टक्के पाणी होते.
सल्फ्यूरिक अॅसिड : 397 अंशावर मग एसओ2 निघाला, तसेच लोहाच्या आयनांचा स्पाइक. हे फेरिक सल्फेटचा संकेत आहे. याचा अनुमान 16 टक्के असून हा यौगिक अधिक उष्णता सहन करू शकतो.
लोखंड कुठून आले : अंतराळाची धूळ (कॉस्मिक डस्ट) शुक्राच्या वातावरणात येते, हे अॅसिड ढगांद्वारे रिअॅक्ट होत फेरिक सल्फेट तयार करते.
पूर्वी चूक का घडली?
पूर्वी दुर्बिणींद्वारे स्पेक्ट्रोस्कोपी (रंगांद्वारे विश्लेषण) केले जात होते. हे केवळ हवेत मिसळलेले पाणी दाखवू शकत होते, हायड्रेटेड पाणी दाखवू शकत नव्हते. परंतु प्रोबने थेट ढगांच्या कणांचे मापन केले, यामुळे योग्य निष्कर्ष मिळाला आणि या रहस्याची उकल झाली.
जीवनाच्या शक्यतेवर प्रभाव
शुक्रावरील ढगांमध्ये जीवनाचा सर्वात मोठा तर्क पाण्याची कमतरता होता, परंतु आता पाणी मोठ्या प्रमाणात असल्याचे कळले आहे. परंतु हे पाणी अॅसिडयुक्त असून ते पृथ्वीवरील जीवांसाठी कठिण आहे. अॅसिड सहन करणारे मायक्रोबस तेथे जगू शकतात. यासंबंधीचा शोध अॅस्ट्रोबायोलॉजीला नवी दिशा देणार आहे.