वैज्ञानिकांनी शोधला सुपर-अर्थ
647 दिवसात ताऱ्याला घालतो प्रदक्षिणा
वैज्ञानिकांनी एक असा ग्रह शोधला आहे जो पृथ्वीवरील जीवांना वास्तव्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करू शकतो. हा ग्रह पृथ्वीसमान आहे. तसेच तो पृथ्वीपासून केवळ 20 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. हा ग्रह एका सूर्यासारख्या ताऱ्याला प्रदक्षिणा घालत आहे. या ग्रहावर पृथ्वीसारखेच वातावरण असू शकते असे मानले जात आहे. याला सुपर-अर्थ नाव देण्यात आले असू याचे नाव एचडी 20794 डी आहे. या ग्रहाने स्वत:च्या ताऱ्याला 647 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा घातली आहे. हा ग्रह वास्तव्ययोग्य क्षेत्रात येत असल्याने यावर पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे. या शोधाची पुष्टी इन्स्टीट्युटो डी एस्ट्रोफिसिका डी कॅनरियास आणि युनिव्हर्सिडॅड ला लगुनाने केली आहे.
हा सुपरअर्थ स्वत:च्या तारा एचडी 20794 च्या वास्तव्ययोग्य क्षेत्रात परिक्रमा घालत आहे. एचडी 20794 ला प्रदक्षिणा घालणारा हा एकमेव तारा नाही. हा तारा आमच्या सूर्यापेक्षा काहीसा छोटा असून तो अनेक वर्षांपासून वैज्ञानिकांसाठी स्वारस्याचा विषय राहिला आहे. याच्या चहुबाजूला प्रदक्षिणा घालणाऱ्या अन्य दोन ग्रहांचा शोध लावण्यात आला असू त्यांनाही सुपरअर्थ म्हटले गेले आहे.
20 वर्षांनी खुलासा
हा खुलासा 20 वर्षांच्या अवलोकनानंतर झाला आहे आणि यामुळे पृथ्वीसारख्या ग्रहांच्या वातावरणाचा अधिक विस्तृतपणे अध्ययन करण्याचे मार्ग खुले होऊ शकतात. हा शोध अलिकडेच एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. पृथ्वीच्या बाहेर जीवन शोधण्याचा आधार हा सूर्यासारख्या ताऱ्यांच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रांमध्ये स्थित ग्रहांना शोधणे आहे. वैज्ञानिक पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उत्पत्तित मदत करणाऱ्या समान परिस्थितींविषयी देखील जाणू शकतात.