वैज्ञानिकांनी शोधला नवा रंग
शोधण्यात आलेल्या नव्या रंगाला ओलो मिळाले नाव
आतापर्यंत जगात अशा अनेक प्रजाती आहेत, ज्या माणसांनी पाहिल्या नाहीत. परंतु रंगांवरून आमचे ज्ञान किती मर्यादित असू शकते, याचा आभास वैज्ञानिकांनी करवून दिला आहे. वैज्ञानिकांनी एका अशा रंगाचा शोध लावला आहे, जो आतापर्यंत माणसांनी पाहिला नव्हता. या रंगाचे नाव ओलो ठेवण्यात आले आहे. ओलो स्पष्टपणे कसा दिसतो याचा तपशील दिला जाऊ शकत नाही, परंतु तो मोराच्या निळ्या किंवा चैती रंगासारखा असल्याचे सांगण्यात आले आहे. या रंगाला पाहणे सर्वसामान्य लोकांना शक्य नाही. वैज्ञानिकांनी देखील हा रंग पाहण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. याकरता डोळ्यांच्या रेटिनावर लेझर बीम फायर करण्यात आले आणि मग हा रंग पाहिला गेला. आतापर्यंत या रंगाला केवळ संशोधन करणाऱ्या 5 लोकांनीच पाहिले आहे. माणूस कधीच या रंगाला स्वत:च्या दैनंदिन जीवनात पाहू शकणार नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
सामान्य जीवनात दिसणार नाही रंग
या लेझर फ्लॅशमुळे मेंदू कशाप्रकारे काम करणार हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्साहित होतो. हा रंग कधीच स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्हीवर दिसणार नाही आणि हा व्हीआर हेडसेटच्या जगापासून खूप दूर असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. या रंगाचा आभास करविणारे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. परंतु हा ओलोची वास्तविक प्रतिमा दाखवू शकत नाही. कुठलाही लेख किंवा मॉनिटरवर या रंगाला व्यक्त करण्याची कुठलीच पद्धत नसल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले.