कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वैज्ञानिकांनी शोधला नवा रक्तगट

06:22 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50 वर्षे जुन्या रहस्याची उकल

Advertisement

1972 मध्ये एका गरोदर महिलेच्या रक्तात अनोखी कमतरता आढळून आली होती. 50 वर्षांच्या संशोधनानंतर ब्रिटन आणि इस्रायलच्या वैज्ञानिकांनी एका नव्या रक्तगटाचा शोध लावला आहे. या टीमने स्वत:च्या पेपरमध्ये या संशोधनाला प्रकाशित केले आहे. यामुळे दुर्लभ रक्तगट असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.

Advertisement

सुमारे 20 वर्षांपर्यंत या रक्तसंबंधी विशिष्टतेवर संशोधन केल्यावर यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे हेमेटोलॉजिस्ट लुईस टिली यांनी ही एक मोठी कामगिरी असल्याचे उद्गार काढले आहेत. आमच्या रक्तात अनेक प्रकारचे रक्तसमूह असतात, ज्यात एबीओ आणि आरएच प्रमुख आहेत, हे रक्त समूह प्रोटीन आणि शर्करेने निर्माण होतात, जे रक्तपेशींवर आढळून येतात, आमचे शरीर त्यांचा वापर आजारांची ओळख पटविण्यासाठी करते, हानिकारक घटकांपासून बचाव करते. रक्त चढविताना रक्तसमूह जुळणे अत्यंत आवश्यक आहे. जर रक्तसमूह जुळले नाहीत, तर यामुळे गंभीर प्रतिक्रिया होऊ शकतात, नव्या रक्तसमुहाच्या शोधामुळे दुर्लभ रक्तगट असलेल्या रुग्णांवर चांगले उपचार होऊ शकतील असे टिली यांनी सांगितले आहे.

 

नवा रक्तगट एमएएल

99.9 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये एएनडब्ल्यूजे एंटीजन असते, जे 1972 च्या रुग्णाच्या रक्तात नव्हते. हे एंटीजन मायलिन आणि लिम्फोसाइट प्रोटीनवर आढळून येते, ज्यामुळ संशोधकांनी नव्या रक्तसमुहाला एमएएल ब्लड ग्रूप नाव दिले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही एमएएल जनीमध्sय म्युटेशन होते, तेव्हा त्याचे रक्त एएनडब्ल्यूजे निगेटिव्ह होते. टिली अणि त्यांच्या टीमने हा दुर्लभ रक्तगट असलेल्या तीन रुग्णांची ओळख पटविली आहे. परंतु हे म्युटेशन नव्हते. यामुळे कधीकधी रक्तविकार देखील एंटीजन दडवू शकते असे कळते.

एमएएल रक्तसमूह

-हे रक्त समूह मायलिन आणि लिम्फोसाइट प्रोटीनवर आधारित आहे.

-एएनडब्ल्यूजे एंटीजनच्या अनुपस्थितीमुळे एमएएल रक्तसमुहाची ओळख होते.

-दुर्लभ रक्तप्रकार असलेल्या रुग्णांमध्ये एमएएल जीन म्युटेशन किंवा रक्तविकार.

एमएएलची ओळख पटविणे अवघड

वेस्ट ऑफ इंग्लंड विद्यापीठाचे सेल बायोलॉजिस्ट टिम सेटचवेल यांनी एमएएल एक अत्यंत छोटे प्रोटीन असून यात काही अनोखे गुण असल्याने याची ओळख पटविणे अवघड असल्याचे सांगितले.  दशकांच्या संशोधनानंतर टीमने सामान्य एमएएल जीनला एएनडब्ल्यूजे निगेटिव्ह रक्तपेशींमध्ये सोडले, यामुळे प्रभावी स्वरुपात त्या पेशींमध्ये एएनडब्ल्यूजे एंटीजन पोहोचले. एमएएल प्राटीन पेशींच्या रचनेला स्थिर ठेवणे आणि पेशी परिवहनात सहाय्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article