For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वैज्ञानिकांकडून युनिव्हर्सल किडनीची निर्मिती

07:00 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
वैज्ञानिकांकडून युनिव्हर्सल किडनीची निर्मिती
Advertisement

प्रत्येक रक्तगटाशी होणार मॅच : डोनर शोधण्याची गरज भासणार नाही

Advertisement

किडनीच्या आजारांनी ग्रस्त लाखो लोक रोज नव्या आशेचा किरण शोधत असतात. परंतु आता कॅनडा आणि चीनच्या वैज्ञानिकांनी 10 वर्षांच्या मेहनतीनंतर युनिव्हर्सल किडनी तयार केली आहे. ही किडनी कुठल्याही रक्तगटाच्या रुग्णाला दिली जाऊ शकते. यामुळे प्रतीक्षायादी कमी होत अनेक जीव वाचणार आहेत. सद्यकाळात किडनी प्रत्यारोपणासाठी दात्याची किडनी रिसिव्हरच्या रक्तगटाशी मॅच करणारी असावी लागते. ओ टाइपचा ब्लड ‘युनिव्हर्सल डोनर’ आहे, म्हणजे हे कुठल्याही गटाला (ए, बी, एबी, ओ) दिले जाऊ शकते. परंतु ओ टाइपचा रक्तगट तुलनेत कमी प्रमाणात आढळत असतो. प्रतीक्षायादीवर निम्म्याहून अधिक लोक ओ टाइपच्या किडनीची प्रतीक्षा करत असतात. अमेरिकेत दररोज 10 लोक किडनी न मिळाल्याने मृत्युमुखी पडत असतात. भारतातही लाखो लोक डायलिसिसवर जगत आहेत. जर वेगळ्या रक्तगटाची किडनी प्रत्यारोपित केली, तर शरीर त्याला बाहेरील घटक ठरवत नाकारते.

युनिव्हर्सल किडनी

Advertisement

ही नवी किडनी ‘ओ टाइप’सारखी आहे, जी कुठल्याही रक्तगटाने युक्त रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करता येईल. वैज्ञानिकांनी ए टाइपच्या किडनीला ओ टाइपमध्ये बदलले आहे. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे बायोकेमिस्ट स्टीफन विथर्स यांनी या किडनीची पहिल्यांदाच मानवी शरीरात चाचणी झाल्याचे सांगितले आहे. या चाचणीतून आम्हाला दीर्घकाळापर्यंत काम करण्याच्या टिप्स मिळाल्या. ही किडनी मृत मेंदू व्यक्तीच्या शरीरात अनेक दिवसांपर्यंत काम करत राहिली. परिवाराच्या सहमतीनंतर हे संशोधन झाल्याचे विथर्स यांनी सांगितले.

एंजाइम्सचा वापर

ए, बी किंवा एबी रक्तगटात किडनीच्या पृष्ठभागावर शुगर मॉलिक्यूल्स (एंटीजेन्स) असतात, जे शरीराला ही ‘आपली’ आहे किंवा ‘बाहेरील’ आहे हे सांगत असतात. ओ टाइपमध्ये हे एंटीजेन्स नसतात, वैज्ञानिकांनी स्पेशल एंजाइम्स वापरले, जे ए टाइपच्या एंटीजेन्सना कापतात. विथर्स याची कारचा रंग हटविण्याशी तुलना करतात. लाल रंग हटवून न्यूट्रल प्रायमर दाखविण्यासारखे हे आहे. एंटीजेन्स हटताच इम्यून सिस्टीम किडनीला आपले मानते, हे एंजाइम्स पूर्वीच ओळखण्यात आले होते, परंतु आता त्यांना किडनीवर यशस्वीपणे वापरण्यात आले आहे. यासंबंधीचे संशोधन नेचर बायोमेडिकल इंजिनियरिंगमध्ये प्रकाशित झाले आहे.

कसे झाले परीक्षण?

ब्रेन-डेड व्यक्तीच्या शरीरात ए टाइपची किडनी प्रत्यारोपित करण्यात आली. जी अनेक दिवसांपर्यंत काम करत राहिली, ब्लड फिल्टर केले, वेस्ट हटविले, तिसऱ्या दिवशी ए टाइमचे साइन थोडेसे दिसले, ज्यामुळे किंचिन इम्यून रिस्पॉन्स झाला, परंतु हे सामान्यापेक्षा कमी होते. शरीर किडनीला सहन करण्याचा प्रयत्न करत होते. आमचे संशोधन आता खऱ्या जगात प्रभाव दाखवत असल्याचे विथर्स यांनी सांगितले आहे.

पुढील आव्हाने

ही तर केवळ सुरुवात असून अद्याप अनेक समस्या उभ्या राहू शकतात...

  • एंटीजेन्स पूर्णपणे न हटल्यास रिजेक्शन होऊ शकते.
  • दीर्घकाळापर्यंत कसे टिकणार? सध्या केवळ काही दिवसांसाठी परीक्षण
  • जिवंत रुग्णांवर परीक्षण कधी हे अद्याप स्पष्ट नाही.

वैज्ञानिक अन्य मार्ग देखील आजमावत असून यात डुकराच्या किडनीचा वापर करणे किंवा नव्या अँटीबॉडीज तयार करणे सामील आहे. परंतु ही युनिव्हर्सल किडनी प्रतीक्षा कालावधी कमी करत लाखो जीवांना वाचवू शकते.

का महत्त्वपूर्ण?

जगभरात किडनी फेलियर वाढत आहे, मधूमेह, उच्च रक्तदाबामुळे हा प्रकार घडत आहे, अमेरिकेत 1 लाखाहून अधिक लोक प्रतीक्षायादीवर आहेत, भारतात हे प्रमाण 2 लाखाहून अधिक आहे. ओ टाइपच्या कमतरतेमुळे बहुतांश रुग्णांचा मृत्यू ओढवत असतात, युनिव्हर्सल किडनी उपलब्ध झाल्यास दात्यांची संख्या दुप्पट होणार आहे.

Advertisement
Tags :

.