वैज्ञानिकांकडून कृत्रिम जिभेची निर्मिती
खाण्यातील तिखटपणाचा घेणार शोध
विज्ञान जसजशी प्रगत आहेत, तसतसा माणूस अशा गोष्टी निर्माण करत आहेत, ज्या मानवतेसाठी उपयुक्त आहेत. अलिकडेच वैज्ञानिकांना असाच अनोखा आविष्कार केला आहे. वैज्ञानिकांनी कृत्रिम जीभ तयार केली असून ती जेवणातील तिखटपणाची माहिती मिळवून देणार आहे. काही सेकंदात ही जीभ मसाल्याची सर्व इत्यंभूत माहिती मिळवून देईल. चीनच्या वैज्ञानिकांनी ही कृत्रिम जीभ तयार केली असून ती जेवणातील तिखटपणा काही सेकंदात ओळखू शकते. हे नवे तंत्रज्ञान अशा लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे, जे मिरची किंवा मसाल्यांबद्दल संवेदनशील आहेत किंवा ज्यांची चव ओळखण्याची क्षमता कमकुवत झाली आहे. हा आविष्कार भविष्यात रोबोट्स फूड टेस्टिंग डिव्हाइस आणि स्वाद संबंधी आजारांनी पीडित रुग्णांसाठी अत्यंत सहाय्यभूत ठरणार असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
या कृत्रिम जिभेचे डिझाइन दूधात आढळून येणाऱ्या केसिन प्रोटीनने प्रेरित आहे. केसिन हे प्रोटीन पॅप्साइसिन म्हणजेच मिरचीत तिखटपणा आणणाऱ्या घटकाला निष्क्रीय करते. जेव्हा एखाद्याला तिखटपणा खूप जाणवतो, तेव्हा दूध पिल्यावर दिलासा मिळतो आणि हेच विज्ञान आता या आर्टिफिशियल टंगचा आधार ठरले असल्याचे संशोधक पथकाचे प्रमुख वेजुन डेंग यांनी सांगितले.
वैज्ञानिकांनी एक्रिलिक अॅसिड कोलीन क्लोराइड आणि स्किम्ड मिल्क पावडरला मिळून एक जेलसारखी पातळ, पारदर्शक फिल्म तयार केली, याला यूव्ही लाइटमध्ये ठेवण्यात आले. ज्यामुळे हा लवचिक आणि हलक अपारदर्शक पदार्थ ठरला. हा जेल विद्युताला प्रवाहित करू शकतो आणि जेव्हा हा पॅप्साइसिन किंवा एखाद्या तिखट पदार्थाच्या संपर्कात येतो, तेव्हा प्रवाहात परिवर्तन होते. हेच परिवर्तन या कृत्रिम जिभेला खाद्यपदार्थ किती तिखट आहे, हे सांगते. संशोधकांनी या तंत्रज्ञानाचे परीक्षण 8 प्रकारच्या मिरची आणि 8 प्रकारच्या तिखट व्यंजने म्हणजेच हॉट सॉस इत्यादींवर केले. परिणामात कॅप्साइसिनला फिल्मवर टाकल्याच्यह केवळ 10 सेकंदानंतर विद्युत प्रवाहात घट झाली, यातून फिल्म तिखटपणा ओळखण्यास सक्षम असल्याचे कळले. ही कृत्रिम जीभ कमी तिखटपणापासून अत्यंत अधिक तिखटपणा ज्याला माणूस सहन करू शकत नाही किंवा जे वेदनादायी असते, दोन्ही स्तरांपर्यंत याची ओळख पटवू शकते.