पाचवीपर्यंतच्या शाळा हरियाणात ऑनलाईन
वाढत्या प्रदूषणामुळे नायब सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ पंचकुला
हरियाणातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नायब सरकारने पाचवीपर्यंतच्या शाळा पुढील काही दिवस ऑनलाईन पद्धतीने चालविण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्यानुसार पाचवीपर्यंतच्या शाळा तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षण संचालनालयाने सर्व जिल्हा उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. प्रदूषणाची गंभीर पातळी लक्षात घेऊन आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या हितासाठी प्रचलित परिस्थितीचे मूल्यांकन करून इयत्ता 5 वीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. स्थानिक पातळीवरील हवेची गुणवत्ता विचारात घेऊन संबंधित जिह्यांच्या ग्रामीण आणि शहरी भागांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन केले जाऊ शकते, असेही सुचित करण्यात आले आहे.
हरियाणामधील अनेक शहरे सध्या धुक्मयाच्या चादरीमध्ये लपेटली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सतत धुके वाढत आहे. होते. हरियाणातील आठ शहरांचा ‘एक्यूआय’ गंभीर श्रेणीत आहे. भिवानी हे शहर राज्यात सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वीही या शहरातील सर्वात हवा खराब होती. राज्यात धुक्मयात झपाट्याने वाढ होत असल्याने अपघातांमध्येही वाढ होत आहे. सर्वात गंभीर श्रेणीतील शहरांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. हरियाणातील भिवानी व्यतिरिक्त बहादूरगड, सोनीपत, जिंद, रोहतक, कैथल, कर्नाल, गुऊग्राममधील हवेची गुणवत्ताही बिघडलेली आहे.