महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केपीएससी परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने शाळांची तारांबळ

11:00 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : केपीएससीअंतर्गत शनिवारी व रविवारी बेळगावसह राज्यात गट ‘ब’ व ‘क’ करिता परीक्षा घेण्यात येणार होत्या. परंतु या परीक्षा शुक्रवारी सायंकाळी अचानक रद्द करण्यात आल्या. स्पर्धात्मक परीक्षा असल्याने परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी यापूर्वीच सुटी जाहीर केली होती. परंतु परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना संपर्क साधून शाळा सुरू असल्याचे सांगावे लागल्याने शाळेतील शिक्षकांची तारांबळ उडाली.  कर्नाटक सर्व्हिस पब्लिक कमिशनकडून दि. 14 व 15 रोजी परीक्षा होणार होती. केवळ बेळगाव शहरातच 35 केंद्रांवर परीक्षा होणार असल्याने शहरातील शाळांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात आली. परंतु अचानक शुक्रवारी सायंकाळी केपीएससीने परीक्षा रद्द केली. यामुळे शाळांना विद्यार्थी व पालकांशी पुन्हा संपर्क साधून शाळा असल्याचे सांगावे लागले. शाळांना सुटी असते म्हणून अनेकांनी गावी जाणे पसंत केले. त्यामुळे पालकांमधूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article