महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने तालुक्यातील शाळा गजबजल्या

10:26 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालुक्यात शाळा प्रारंभोत्सव उत्साहात, गावागावांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत : शाळांना आकर्षक सजावट : पाठ्यापुस्तके-मिठाईचे वाटप

Advertisement

वार्ताहर /किणये 
Advertisement

तालुक्याच्या गावा-गावांमधील शाळांमध्ये शुक्रवार दि. 31 रोजी शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात झाला. नवीन शैक्षणिक वर्षाला सुऊवात झाली असून शुक्रवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुटीनंतर शुक्रवारी तालुक्यातील शाळा गजबजल्या. शुक्रवारी शाळा प्रारंभोत्सवानिमित्त गावागावांमधील शाळांना आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. आंबोती बांधण्यात आली होती. तसेच स्वागतकमानही उभारण्यात आली होती. शाळेच्या परिसरात विविध रंगांच्या रांगोळ्याही काही ठिकाणी घालण्यात आल्या होत्या. शाळेत पहिल्या दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साह वाटावा यासाठी या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर काही ठिकाणी मिठाई व गोड पदार्थांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

गांधी टोप्या परिधान करून विद्यार्थ्यांचे स्वागत

सावगाव येथील प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना गांधी टोप्या परिधान करून विद्यार्थ्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कमिटीचे सदस्य, गावातील प्रमुख मान्यवर मंडळी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. खादरवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेलाही आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. शाळेत पहिलीच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात येत होते.

मोफत पाट्यांचे वाटप

बहाद्दरवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एसडीएमसी कमिटी व शिक्षकांच्या वतीने मोफत पाट्यांचे वाटप करण्यात आले. नावगे गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेत उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे विशेष पूजन करण्यात आले. त्यावेळी एसडीएमसी कमिटी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. संतिबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये किणये, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळगुंदी, बोकनुर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनूर, बेळवट्टी, बामनवाडी, बाळगमट्टी, पिरनवाडी, मच्छे, हलगा, बस्तवाड, देसूर, नंदीहळ्ळी राजहंसगड, झाडशहापूर आदी गावांतील शाळांमध्ये शुक्रवारी विविध उपक्रम राबविण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article