For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आक्रमक भूमिकेमुळे शाळा स्थलांतराचा प्रयत्न फसला

01:06 PM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
आक्रमक भूमिकेमुळे शाळा स्थलांतराचा प्रयत्न फसला
Advertisement

पालक-माजी विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे मराठी शाळा वाचविण्यात यश

Advertisement

बेळगाव : बालदिनीच शहरातील मराठी शाळा बंद पाडण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न होता. परंतु पालक व माजी विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे अखेर हा प्रयत्न फसला. गणपत गल्ली कोंबडी बाजार येथील सरकारी प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्र. 1 बंद करण्याचा प्रयत्न हाणून पाडत याच शाळेमध्ये पुन्हा वर्ग भरविण्यात आले. बेळगाव शहरातील सर्वात जुनी मराठी शाळा असलेल्या गणपत गल्लीतील कोंबडी बाजार येथील शाळा इतरत्र हलविण्याचा प्रयत्न शुक्रवारी दिसून आला. 1830 साली सुरू झालेल्या या शाळेतील विद्यार्थी कंबळी खूट येथील (गणपत गल्ली कॉर्नर) शाळेमध्ये हलविण्यात आले. शाळा इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचे प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू होते. याची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेमध्ये धाव घेतली. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थीही पुढे सरसावले. शाळा इमारतीमध्ये किरकोळ डागडुजी केल्यास त्या ठिकाणी पुन्हा वर्ग भरविले जाऊ शकतात, हे दिसून आले. त्यामुळे पालकांनी आपली मुले पुन्हा कोंबडी बाजार येथील शाळेमध्ये आणून बसविली. नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनीही घटनास्थळी पोहोचून शाळेची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.