कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोपाळमध्ये स्कूलबसची आठ वाहनांना धडक

06:50 AM May 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिला डॉक्टरसह दोघांचा मृत्यू : ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

Advertisement

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सोमवार, 12 मे रोजी दुपारी बाणगंगा चौकात एका सिग्नलवर उभ्या असलेल्या लोकांना मागून एका स्कूलबसने धडक दिली. यामध्ये एका महिला डॉक्टरसह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कूलबसचे ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या अपघाताची घटना कैद झाली असून त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

भोपाळमधील बाणगंगा चौकात एका स्कूलबसने 8 वाहनांना धडक दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या अपघातात आयशा खान नामक एका बीएएमएस डॉक्टरचा मृत्यू झाला. अपघाताचा व्हिडिओ पाहून स्कूलबसचे ब्रेक निकामी झाल्याचे दिसून येत आहे. भरधाव बसच्या धडकेमुळे सिग्नलवर थांबलेल्या वाहनांनासावरण्याची संधीही मिळाली नाही. घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत व बचावकार्य सुरू केले.

भोपाळ आरटीओच्या मते, बसची फिटनेसची मुदत नोव्हेंबर 2024 मध्ये संपली होती. तरीही ती रस्त्यावर धावत होती, असे भोपाळ आरटीओ जितेंद्र शर्मा यांनी सांगितले. अपघातग्रस्त बस आयपीएस स्कूलमध्ये नोंदणीकृत होती. संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. रस्त्यावर फिट नसलेले वाहन चालवणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article