राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना करणार
पणजी : अखिल भारतीय दर्जाच्या संस्थांमध्ये अखिल भारतीय कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा, असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यातून अर्ज करावा व प्रवेश मिळवून गोवा सरकारच्या या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, असेही मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मनोहर पर्रीकर गोवा शिष्यवृत्ती योजनेच्या धर्तीवर जागतिक 500 क्रमांकाच्या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आणि परदेशात पदवीपूर्व स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही नवीन शिष्यवृत्ती योजना आखावी, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्च शिक्षण संचालनालयाला सांगितले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआटी), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (एआयएमस), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनल रिसर्च (आयआयएसईआर), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएस), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स (आयआयएमएस), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आयएसआय) आणि इंडियन कौन्सिल ऑफ अ?@ग्रिकल्चर रिसर्च (आयसीएआर), गोवा मेडिकल कॉलेज, गोवा डेंटल कॉलेज, ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक सायन्स, गोवा आणि तत्सम दर्जाच्या संस्थांमध्ये अखिल भारतीय कोट्यातून निवड झालेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करा, असे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.