एसबीआय योनो 2.0’ अॅप सादर
06:06 AM Dec 13, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने योनो 2.0 लाँच करणार आहे. असे मानले जाते की एसबीआय या आठवड्यात हे अॅप लाँच करू शकते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला एसबीआयचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांनी सांगितले होते की, डिसेंबरच्या अखेरीस, 10 कोटींहून अधिक एसबीआय ग्राहकांना फायदा होण्यासाठी विद्यमान योनो अॅप लाँच केले जाऊ शकते.
Advertisement
फायनान्शियल एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, एसबीआयचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांनी म्हटले आहे की, योनो 2.0 15 डिसेंबर 2025 रोजी लाँच केले जाईल. यासोबतच, सध्या योनो अॅपच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन ग्राहकांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून हे अॅप जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.
Advertisement
Next Article