एसबीजी युवा क्रीडा महोत्सव उत्साहात
बेळगाव : गुडशेफर्ड पदवीपूर्व सायन्स कॉलेज (इंटिग्रेटेड),आयोजित दोन दिवसांच्या युवा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन एम. एम. कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य वाय. एम. पाटील, प्राचार्य निंगप्पा शिरश्याड उपस्थितीत होते.मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत कनक मेमोरियल स्कूल, नेहरूनगर यांनी विजेतेपद पटकावले, तर एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, टिळकवाडी उपविजेते ठरले. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलने विजेतेपद तर सेंट जोसेफ ऑर्फन्स स्कूल, संतिबस्तवाडने उपविजेतेपद मिळविले.
या महोत्सवात सुमारे 40 शाळांमधील 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी फुटबॉल, बॅडमिंटन, पोहणे, सांस्कृतिक स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभाग दर्शविला.बॅडमिंटन (मुले) स्पर्धेत ज्ञान प्रबोधन मंदिर स्कूलने विजेतेपद तर केएलई इंटरनॅशनल स्कूल, कुवेंपू नगर उपविजेते ठरले. मुलींच्या बॅडमिंटनमध्ये केएलई इंटरनॅशनल स्कूलने प्रथम स्थान तर लव्हडेल सेंट्रल स्कूलने दुसरे स्थान मिळविले. पोहण्यामध्ये सेंट पॉल्सच्या वेदांत मिसाळे मुलांच्या विभागात तर सेंट जोसेफ स्कूल, श्रुष्टी मुलींच्या विभागात ‘बेस्ट स्विमर्स’ठरले. बक्षिस वितरण प्रसंगी राज घाटगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुडशेफर्ड पीयू सायन्स कॉलेजचे प्राचार्य एम. आय. मुल्तानी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.