कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हणे...प्रिस्क्रीप्शनवरही हवी कन्नड

12:57 PM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अवास्तव मागण्यांमुळे कन्नड संघटना ठरताहेत डोईजड 

Advertisement

बेळगाव : कन्नडसक्ती केवळ सरकारी कार्यालयातील फलक अथवा कागदपत्रांपुरती मर्यादित न राहता आता खासगी व्यवसायांपर्यंत पोहोचली आहे. नुकतेच एका कन्नड संघटनेने निपाणी येथील एका डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन समाजमाध्यमांवर व्हायरल केले असून यामध्ये कन्नड का नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे यापुढे खासगी  डॉक्टरांवरही कन्नडसक्ती लादली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगावसह निपाणी व खानापूर या परिसरात मराठी भाषिक अधिक असल्यामुळे डॉक्टरांनी मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये आपले प्रिस्क्रीप्शन काढले आहे.

Advertisement

स्थानिक नागरिकांना जी भाषा समजते, त्या भाषेतून  डॉक्टर त्यांना वैद्यकीय सल्ला देत असतात. परंतु, आता या प्रिस्क्रीप्शनलाही कन्नड संघटनांकडून आक्षेप घेण्यात येत असल्याने कन्नडसक्ती दिवसेंदिवस अधिक तीव्र केली जात असल्याचे दिसत आहे. बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्यामुळे आजतागायत येथील व्यवहार मराठीतून होत होते. सरकारी कार्यालयांमध्ये कन्नडसक्ती करण्यात आली असल्याने त्या ठिकाणी इतकेच सर्व व्यवहार कन्नडमध्ये होत होते. परंतु, कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर महानगरपालिकेतील मराठी फलक हटविण्यात आले. बेळगावमधील गणेशोत्सव मंडळाचा स्वागत फलक हटविण्यात आला. गणेशभक्तांचा झालेला उद्रेक पाहून प्रशासनाला तो फलक पुन्हा लावावा लागला.

संघटनांना वेळीच आवर घाला

कन्नडसक्तीबाबत कन्नड संघटनांच्या कुरापती सुरूच आहेत. कुठेही मराठी दिसले की लगेच त्यावर आक्षेप घेऊन ते कन्नड करण्यास भाग पाडले जात आहे. दुकानांवरील फलकांसोबत आता हॉस्पिटलची प्रिस्क्रीप्शन कन्नडमध्ये करण्यास सांगितली तर एक दिवस हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. मोठा संघर्ष होण्यापूर्वीच प्रशासनाने अशा कुरापती करणाऱ्या संघटनांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article