For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या २० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई

03:20 PM Sep 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी नगरपरिषदेच्या २० कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर  कारवाई
Advertisement

संपातील सहभागामुळे कामावरून काढले

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषद आणि कंत्राटदार 'रोजगार सेवा सहकारी संस्था' यांच्यातील अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे 20 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संपात सहभागी झाल्यामुळे  कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनाचे काम 'रोजगार सेवा सहकारी संस्थे'कडे कंत्राटी पद्धतीने आहे. या संस्थेने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. कामाच्या अटी व शर्तींनुसार, कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या संपात सहभागी होण्यास मनाई होती. परंतु, या अटींचे उल्लंघन करत  काही कर्मचाऱ्यांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये बेमुदत संप पुकारला.कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पगार, पीएफ आणि ईएसआयसीची रक्कम खात्यात जमा होत असूनही संप केला. सणासुदीच्या काळात शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे पाऊल उचलले आहे.'रोजगार सेवा सहकारी संस्थे'चे पत्र संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब दिनकर घाडगे यांनी कर्मचाऱ्यांना  पाठवण्यात  आलेल्या  नोटीसीत म्हटले आहे की"आपण संस्थेने सांगितलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून संप करत आहात. यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेने संस्थेवर दंडात्मक कारवाई केली आहे किंवा करणार आहे. त्यामुळे, दि. १५ सप्टेंबर २०२५ पासून तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येत आहे. तसेच, दंडात्मक कारवाईमुळे संस्थेला झालेला आर्थिक भुर्दंड सप्टेंबर महिन्याच्या पगारातून कपात करण्यात येईल."या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे, आगामी काळात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.