सावजी रसराज भोजनालय आजपासून सुरू
12:29 PM Dec 06, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगावच्या रसिक खवय्यांच्या सेवेसाठी छत्रपती शिवाजी रोडवरील बेलचिक चिकनच्या शेजारी सावजी रसराज भोजनालय रुजू झाले आहे. गेल्या 23 वर्षांपासून खवय्यांची दाद मिळविलेल्या या भोजनालयाची वाटचाल गुणवत्ता आणि चविष्टपणा यामुळे वृद्धींगत होत राहिली आहे. विश्वनाथ झाड यांनी या नव्या वास्तूमधून हे भोजनालय सुरू केले असून त्यांना अमृत आणि प्रसाद या त्यांच्या मुलांचे सहकार्य लाभत आहे. नवीन वास्तूचा शुभारंभ फुलावती अर्जुन पवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी विश्वनाथ झाड, प्रसाद, अमृत झाड तसेच कुटुंबीय अनिता, श्रद्धा, ऐश्वर्या, अंबिका आदी उपस्थित होते. 6 डिसेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article