महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सत्येंद्र जैन यांची होणार सीबीआय चौकशी

06:22 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तिहार तुऊंगात बंदिस्त गुंड मुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन तुऊंगमंत्री जैन यांच्याविऊद्ध तपास करण्याचे आदेश उपराज्यपालांनी दिले आहेत. तिहार तुऊंगाचे तत्कालीन महासंचालक आणि गृह विभाग हाताळणारे सत्येंद्र जैन यांनी आपल्याकडून 10 कोटी ऊपये घेतल्याचा आरोप सुकेश चंद्रशेखर याने केला होता. सुकेश यानी यासंदर्भात दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहिले होते. या प्रकरणात आता दिल्लीचे माजी मंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय तपासाला मंजुरी दिली आहे.

Advertisement

सत्येंद्र जैन यांच्यावर तिहार तुऊंगाचे माजी डीजी संदीप गोयल यांच्या सहकार्याने तिहार तुऊंगातून खंडणीचे रॅकेट चालवल्याचा आणि दिल्लीच्या विविध तुऊंगातील हायप्रोफाईल कैद्यांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखर याने गेल्यावषी 13 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या एलजींना यासंबंधी पत्रव्यवहार केला होता. एलजींना लिहिलेल्या पत्रातील चंद्रशेखर याच्या दाव्यांमुळे तपासकर्ते आश्चर्यचकित झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article