कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सात्विकसाईराज-चिराग शेट्टी दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत

06:56 AM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मकाव

Advertisement

भारताची बॅडमिंटनमधील पुरुष दुहेरीची स्टार जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी येथे सुरू झालेल्या मकाव ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात करीत दुसरी फेरी गाठली. या जोडीने मलेशियाच्या लो हँग यी व एन्ग एन्ग चेआँग यांचा पराभव केला. मात्र महिला दुहेरीत त्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत जेतेपद पटकावलेल्या सात्विक-चिराग यांनी सफाईदार प्रदर्शन करीत मलेशियन जोडीवर 21-13, 21-15 असा केवळ 36 मिनिटांत मात केली. सात्विक-चिराग यांनी प्रारंभापासूनच मलेशियन जोडीवर प्रभुत्व मिळवित 6-1 अशी झटपट आघाडी घेतली. मलेशियन जोडीनेही जोरदार प्रतिकार करीत त्यांची आघाडी 10-9 अशी कमी केली असली तरी भारतीय जोडीने लगेच नियंत्रण मिळविले आणि हा गेम जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने सात्विक-चिरागवर दडपण ठेवत 13-14 अशी आघाडी घेतली. यानंतर मात्र माजी जागतिक अग्रमानांकित जोडीने मुसंडी मारत 17-13 अशी बढत मिळविली आणि सलग चार गुण मिळवित गेमसह सामना जिंकत आगेकूच केली.s

महिला एकेरीत अनमोल खर्ब व तसनिम मिर यांनी पात्रता फेरी पार करीत मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. अनमोलने अझरबैजानच्या केइशा फातिमा अझाहराचा 21-11, 21-13, तर तसनिमने थायलंडच्या तिडाप्रॉन क्लीबीसनचा 21-14, 13-21, 21-17 असा पराभव केला. तसनिमची मुख्य ड्रॉमध्ये सलामीची लढत चीनच्या चेन यु फेईशी होईल तर अनमोलची पहिली लढत द्वितीय मानांकित थायलंडच्या ओ. बुसाननशी होईल.

महिला दुहेरीत अग्रमानांकन मिळालेल्या त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तासाभराच्या झुंजार लढतीत त्यांना चिनी तैपेईच्या लिन झिआव मिन व पेंग यु वेइ यांनी 16-21, 22-20, 21-15 असे हरविले. पुरुष दुहेरीच्या अन्य सामन्यात डिंगकू सिंग कोनथौजम व अमान मोहम्मद यांनी पात्रता फेरी पार करीत मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले. त्यांनी हाँगकाँगच्या लॉ चेउक हिम व यूंग शिंग चोइ यांच्यावर 21-18, 21-17 अशी मात केली. मुख्य स्पर्धेत त्यांची सलामीची लढत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय व साई प्रतीक के या आपल्याच देशाच्या सहकाऱ्यांशी होईल.

मिश्र दुहेरीत टी. हेमा नागेंद्र बाबू व प्रिया कोनजेन्गबम यांनी मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले असून त्यांची लढत थायलंडच्या फुवानत हॉरबनल्यूकित व फुंगफा कॉर्पथम्माकित यांच्याशी होईल. दरम्यान, मीराबा लुवांग मैसनमला मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले. पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात तिला चीनच्या झु जुआन चेनकडून 15-21, 21-17, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article