सात्विक-चिराग मानांकनात दहाव्या स्थानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मंगळवारी भाकित करण्यात आलेल्या पुरुष दुहेरीच्या ताज्या मानांकन यादीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी पुरुष दुहेरीत उपांत्य फेरी गाठली होती. या कामगिरीमुळे या जोडीचे मानांकनातील स्थान तीन अंकांनी वधारले. यापूर्वी ही जोडी मानांकनात 13 व्या स्थानावर होती. आता ती दहाव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी मानांकनात पुन्हा अग्रस्थानावर झेप घेतली होती.
पुरुष एकेरीच्या मानांकनात भारताचा लक्ष्य सेन 17 व्या स्थानावर असून एच. एस. प्रणॉय 33 व्या स्थानावर आहे. महिला एकेरीत भारताची 17 वर्षीय उन्नती हुडा 31 व्या स्थानावर आहे. पी. व्ही. सिंधू 15 व्या स्थानावर आहे. महिला दुहेरीच्या मानांकनात भारताची जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी आपले अकरावे स्थान कायम राखले आहे. तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा 45 व्या स्थानावर आहेत.