कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सात्विक-चिरागचे लक्ष्य जेतेपदावर

06:05 AM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मकॉव बॅडमिंटन स्पर्धा आजपासून, लक्ष्य सेन, प्रणॉयची कसरत

Advertisement

वृत्तसंस्था / मॅकॉव

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मकॉव खुल्या सुपर 300  पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पुढील महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंना मकॉवची स्पर्धा पूर्वतयारीकरिता महत्त्वाची राहील.

आशियाई स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविणाऱ्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या चायना खुल्या सुपर 1000  बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र त्यांना मलेशियाच्या द्वितीय मानांकित जोडी चिया आणि सोह इक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मंगळवारपासून होणाऱ्या मकॉवमधील स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचे लक्ष्य जेतेपदावर राहील तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करतील.

सात्विक आणि चिराग या जोडीने 2025 च्या बॅडमिंटन हंगामात इंडिया खुल्या, सिंगापूर खुल्या तसेच मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली तर इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांना दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली होती. मकॉव स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांचा सलामीचा सामना मलेशियाच्या लो यई आणि चेआँगशी होणार आहे.

पुरुष एकेरीमध्ये 23 वर्षीय लक्ष सेनचा सलामीचा सामना कोरियाच्या जीनबरोबर तसेच एच. एस. प्रणॉयचा सलामीचा सामना पात्र फेरी पार करणाऱ्या स्पर्धकाशी होणार आहे. भारताचा नवोदित बॅडमिंटनपटू सातवा मानांकित आयुष शेट्टीचा पहिल्या फेरीतील सामन्या चीन तैपेईच्या केई बरोबर होईल. गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टीने जेतेपद मिळविले होते. तसेच जर्मनीत झालेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक बॅडमिंटन प्रकारात आयुष शेट्टीने कांस्यपदक मिळविले आहे. सतीश कुमार करुणाकरनचा सलामीचा सामना मलेशियाचा जस्टीन होअ बरोबर होईल.

महिला एकेरीमध्ये भारताची 16 वर्षीय उन्नती हुडाच्या कामगिरीवर अधिक लक्ष्य राहील. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या जेकॉबसन बरोबर होईल. अनुपमा उपाध्यायचा पहिल्या फेरीतील सामना जपानच्या रिकाब गुंजी बरोबर तर आकर्षी कश्यपचा पहिल्या फेरीतील सामना जपानच्या ओकुहाराशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताची टॉपसिडेड जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या मीन आणि वेई यांच्याबरोबर होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article