For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सात्विक-चिराग, लक्ष्यचा विजयी प्रारंभ

06:04 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सात्विक चिराग   लक्ष्यचा विजयी प्रारंभ
Advertisement

बॅडमिंटनमध्ये आश्वासक सुरुवात : टेबल टेनिसमध्येही हरमीत देसाईचा शानदार विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. लक्ष्यने पुरुष एकेरीच्या लढतीत केविन कॉर्डनचा 21-8, 22-20 असा पराभव करून विजयी सुरुवात केली. पुरुष दुहेरीतही भारताच्या सात्विक-चिराग जोडीने धमाकेदार विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. याशिवाय, टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईने जॉर्डनच्या झायेद अमानचा पराभव केला.

Advertisement

शनिवारी युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या लढतीत केविन कॉर्डनचा 21-8, 22-20 असा धुव्वा उडवला. एल गटातील सामन्यात लक्ष्यने आक्रमक सुरुवात करताना पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र कॉर्डनने त्याला चांगली टक्कर दिली परंतु अखेरीस लक्ष्यने पुनरागमन करत हा गेम एकतर्फी जिंकला. लक्ष्य सेनचा पुढील सामना बेल्जियमच्या ज्युलियन कारागीशी सामना होईल.

सात्विक-चिरागचा धमाकेदार विजय

दुसरीकडे सात्विक-चिराग या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने पॅरिस ऑलिम्पिकची विजयी सुरुवात केली आहे. सात्विक-चिराग जोडीने यजमान फ्रान्सच्या कोरवी आणि लाबर जोडीचा सलग सेटमध्ये 21-17, 21-14 असा एकतर्फी पराभव केला. भारतीय जोडीने सुरुवातीपासून शानदार खेळ साकारताना सामन्यावर वर्चस्व गाजवले.

टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाई पुढील फेरीत

भारताने टेबल टेनिसमध्ये चांगली सुरुवात केली. अनुभवी भारतीय खेळाडू हरमीत देसाईने एकतर्फी विजय नोंदवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. हरमीतने जागतिक क्रमवारीत 538 व्या स्थानावर असलेल्या जॉर्डनच्या झायेद अबो यामनवर 4-0 असा शानदार विजय नोंदवला. 30 मिनिटे चाललेल्या या सामन्यात हरमीतने 11-7, 11-9, 11-5, 11-5 असा विजय मिळवला.दरम्यान रोहन बोपण्णा आणि बालाजी यांचा टेनिस दुहेरीतील पहिल्या फेरीचा सामना पावसामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा सामना उद्या म्हणजेच रविवारी होणार आहे. त्याचा सामना गेल मॉनफिल्स/रॉजर-व्हॅसेलिनशी होईल.

Advertisement
Tags :

.