महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सतीश-आद्या मिश्र दुहेरीत विजेते

06:53 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथे झालेल्या 32 व्या इराण फेजर आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत सतीशकुमार करुणाकरण आणि आद्या वेरियात यांनी मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविताना बी. सुमित रेड्डी व एन सिक्की रेड्डी  यांचा पराभव केला. या स्पर्धेत साईकृष्णाने पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.

Advertisement

मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात सतिशकुमार करुणाकरण आणि आद्या वेरियात यांनी बी. सुमित रेड्डी  व एन. सिक्कीरेड्डी यांचा 22-20, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत के. साई प्रतिक आणि कृष्णप्रसाद गर्ग यांनी पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविताना मेक्सिकोच्या कॅस्टिलो आणि लुईस माँटोया यांचा 21-18, 21-19 अशा फडशा पाडला. या स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद हाँगकाँगच्या नेगुएन डेंगने तर महिला एकेरीचे जेतेपद चौथ्या मानांकित तसनिम मीरने पटकाविले. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या नेगुएन डेंगने सतिशचा 21-18, 21-18 तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या सिन लोने तसनिम मीरचा 21-14, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article