For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कशी वाजवली घंटी...बंटी समर्थकांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा! शहरात लावलेल्या फ्लेक्सची एकच चर्चा

04:48 PM Jun 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
कशी वाजवली घंटी   बंटी समर्थकांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा  शहरात लावलेल्या फ्लेक्सची एकच चर्चा
Satej Patil Chief Minister Eknath Shinde
Advertisement

अभिजीत खांडेकर

कोल्हापूरात दाभोळकर कॉर्नरला लागलेल्या एका डिजीटल बॅनरमुळे सगळ्यांचच लक्ष वेधून घेतले असून हा बॅनर सध्या कोल्हापूरात चर्चेचा विषय़ बनला आहे. लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजर्षी शाहू महाराज यांच्या विजयानंतर काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून कशी वाजवली घंटी असा मजकूर लिहला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंटी पाटलांचा चांगलाच चिमटा काढल्याची चर्चा शहरभर चालू आहे.

Advertisement

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=deKCkHCanKg[/embedyt]

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची मानली जाणारी कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसने मारून शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाच्या जागी आपला झेंडा कोल्हापूरात रोवला. शिवसेनेचे तत्कालीन आमदार संजय मंडलिक यांच्या साठी एकनाथ शिंदे यांनी जंग पछाडले होते. कोल्हापूरामध्ये त्यांनी तळ ठोकून संजय मंडलिकांसाठी विशेष जोडण्या लावल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या बैठका घेताना त्यांनी जोरदार प्रचारसभाही घेतल्या होत्या. कोल्हापूर शेवटच्या रॅलीला संबोधताना मुख्यमंत्र्यांनी सतेज उर्फ बंटी पाटलांवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी या निवडणुकीमध्ये "बंटी पाटलांची आता घंटी वाजवणार..." असे म्हटले होते.

Advertisement

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. प्रचारयंत्रणा थंडावली...मतदान झाले....मतमोजणीही झाली. त्यानंतर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीने राज्यभराच चांगली कामगिरी केली. काँग्रेसच्या राज्यात १३ जागा निवडूण येऊन तो राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला. मात्र महायुतीला अपेक्षित यश लाभले नाही. महायुतीने ज्या कोल्हापूरच्या जागेसाठी विषेश प्रयत्न केले होते ती कोल्हापूरची जागा मात्र महायुती आपल्याकडे राखू शकली नाही.काँग्रेसचे आमदार शाहू महाराज छत्रपती यांनी महायुतीचे आमदार संजय मंडलिक यांचा दिड लाखाच्या फरकाने पराभव केला.

शाहू महाराजांच्या या विजयाने बंटी पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला. या विजयामध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या सतेज पाटील याच्या नेर्तृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. मात्र कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे ते विधान चांगलेच मनात ठेवले होते.
आज सकाळी कोल्हापरातील मध्यवर्ती बसस्टँड शेजारी असणाऱ्या दाभोळकार कॉर्नर जवळ सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे डिजीटल लावले. या डिजीटलवर सतेज पाटील यांचा मोठा फोटो लावण्यात येउन त्यावर आता कशी वाजवली घंटी... असा मजकूर लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे.

Advertisement
Tags :

.