For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : सातारकरांना अनुभवता येणार अस्सल गावरान चवीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी

02:57 PM Nov 09, 2025 IST | NEETA POTDAR
satara   सातारकरांना अनुभवता येणार अस्सल गावरान चवीच्या खाद्यपदार्थांची मेजवानी
Advertisement

                   जिल्हा परिषद मैदानावर उमेद बचत गटांच्या पदार्थांची विक्री प्रदर्शन सुरू

Advertisement

सातारा : उमेद अंतर्गत स्वयं सहायता समूहांच्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषद मैदानावर काल पासून सुरू झाले. यानिमित्ताने सातारकरांना अस्सल गावरान चवीचे खाद्यपदार्थ उपलब्ध झाले आहेत. यास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सदर प्रदर्शन दि. १० नोव्हेंबर पर्यंत खुले राहणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे. जिल्हा व्यवस्थापक सुरज पवार, मनोजकुमार राजे, संजय निकम यांच्यासह तालुकास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

दि. ७ ते १० नोव्हेंबर या कालावाधीत जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत सातारकर ग्रंथ महोत्सवास मोठ्या संखेने भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील बचत गटात कार्यरत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरी बाजारपेठ मिळावी आणि शहरी भागातील लोकांना अस्सल गावरान चवीचे पदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने सातारा जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

Advertisement

सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सातारा जिल्हा परिषद मैदानावर सदर प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यात ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी तयार केलेले शुद्ध व अस्सल गावरान खाद्यपदार्थ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.