Satara News : सातारा झेडपीत रंगला सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा!
सातारा जिल्हा परिषदेत आनंदी सेवानिवृत्ती वेतन योजना सुरु
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनंतरचे लाभसंबंधित निवृत्तीवेतनधारकास त्याच महिन्यापासून मिळण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सन २०१७-१८ पासून आनंदी सेवानिवृत्ती वेतन योजना ही अभिनव योजना सुरु करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२५ या महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गातील वर्ग-३ व वर्ग-४ अशा २१ कर्मचायांना सेवानिवृत्तीचा अंतिम लाभाचे आदेश देण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर हे होते. त्यांच्या हस्ते तसेच लेखाधिकारी समाधानचव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी गुफ्राना पटेल, सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय कदम, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
सेवानिवृत्त होणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांपैकी सामान्य प्रशासन विभागाचा १ कर्मचारी, प्राथमिक शिक्षण विभागाचे १२ कर्मचारी,आरोग्य विभागाचे ३ कर्मचारी, बांधका उत्तर विभागाचा १ कर्मचारी व पशूसंवर्धन विभागाचे ४ कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर म्हणाले, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व लाभ सेवानिवृत्तीपूर्वी देण्याबाबत अर्थ विभाग व सामान्य विविध प्रशासन विभागामार्फत विभागांना सीईओ याशनी नागराजन,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना देऊन पाठपुरावा केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे लाभाचे आदेशाचे व सेवापूर्ती गौरवचिन्ह वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधून विस्तार अधिकारी रविंद्र आनंदराव साळुंखे व कुडाळ शाळेच्या पदवीधर शिक्षक बिद्या चिंचकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ व त्यांचे टीमचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ सेवानिवृत्तीपूर्वी दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय कदम यांनी मनोगत व्यक्त केले.