For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Pollitical News :“वोट चोर, गद्दी छोड” घोषणांनी दणाणला सातारा !

06:33 PM Oct 14, 2025 IST | NEETA POTDAR
satara pollitical news  “वोट चोर  गद्दी छोड” घोषणांनी दणाणला सातारा
Advertisement

                                  महिला काँग्रेसची उत्स्फूर्त मोहीम

Advertisement

सातारा : साताऱ्यात आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसतर्फे "वोट चोर, गद्दी छोड" या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं, सातारा येथे संध्याताई सव्वालाखे आणि शिवराजदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रभावी कार्यक्रम पार पडला.

या मोहिमेचा उद्देश — सध्याचे सरकार जनादेशाचा अपमान करून सत्तेत आले असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा होता."वोट चोर, गद्दी छोड" अशा घोषणा देत नागरिकांकडून सही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली.

Advertisement

या मोहिमेदरम्यान सासपडे येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनेचा तीव्र निषेधही करण्यात आला. दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महिला काँग्रेसने केली.

Advertisement
Tags :

.