Satara : वाई येथील खाजगी कंपनीतील २४ वर्षीय तरुणाची कामावरच आत्महत्या
09:39 PM Oct 18, 2023 IST
|
Abhijeet Khandekar
Advertisement
सातारा प्रतिनिधी
Advertisement
वाई एमआयडीसी येथे एस. डी. बी. कंपनीतील एका २४ वर्षीय तरुणाने कंपनीतच आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश रघुनाथ थोरवे, वय २४, रा. व्याहळी, ता. वाई असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कंपनीतच आत्महत्या केल्याने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून तो रात्रपाळीला कामावर होता.
Advertisement
घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान व्याहळी गावातील मित्रमंडळींसह नातेवाईक आणि ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नोंद पोलिसात झाली असून अद्याप आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
Advertisement
Next Article