साताऱ्यात पुरुष, महिला हिंदकेसरी 2024-25 च्या स्पर्धेचे आयोजन ; 800 मल्ल सहभागी होणार
भारतीय शैली कुस्ती महासंघाचे महासचिव गौरव सचदेवा यांची माहिती
सातारा : क्रीडा महर्षी पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्ताने भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्यावतीने हिंद केसरी स्पर्धा सातारा येथे दि.20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत 800 मल्ल सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय शैली कुस्ती महासंघाचे महासचिव गौरव सचदेवा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल महाराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अर्जुन अवॉर्ड विनर गयन सिंग, पैलवान बारणे, खोपडे, दीपक पवार, सुधीर पवार आदी उपस्थित होते. गौरव सचदेवा म्हणाले, सातारा येथे प्रथमच एवढ्या मोठ्या रक्कमेची हिंद केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला अजिंक्य पद अशी आहे.
हिंद केसरी गटात 85 किलो ते140 किलो गटात होणार आहे.प्रथम क्रमांक थार जीप आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमांक ट्रॅक्टर, तृतीय क्रमांक बुलेट, स्प्लेडंर अशी बक्षीस आहेत. 55, 60, 70, 75, 85 वजनी गटात होणार आहेत. त्यासाठी प्रथम क्रमांक दुचाकी, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये, महिला गटात 65 किलो ते 90 किलो गटात होणार असून प्रथम क्रमांक अल्टो, द्वितीय मोपेड, तृतीय 50 हजार रुपये,तसेच 48, 52, 56, 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मोपेड, द्वितीय 50 हजार, तृतीय 20 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे .
या स्पर्धेसाठी 26 राज्यांचे पुरुष संघ, महिला संघ, सात सेवा संघ सहभागी होणार आहेत.भारतीय सेना दल, वायू सेना, बीएसएफ, रेल्वेचे संघ सहभागी होणार आहेत.500 पुरुष मल्ल आणि 250 महिला मल्ल यांचा सहभाग असून त्यांची राहण्याची, खाण्याची सुविधा करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती पट्टू उपस्थित होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.