राज्य सरकारला सुबुद्धी दे! मराठा समाजाचे वाईच्या महागणपतीला साकडे घालून वाई तहसिल कार्यालयावर मोर्चा
सातारा प्रतिनिधी
मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट आणि बॉम्बे गॅझेटचा वापर करुन कुणबी मराठा असे काढलेल्या शासन निर्णयाचे कायद्यात रुपांतर कायद्यात करण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या मागणीचा विचार सरकारने लवकर करावा, त्यासाठी राज्य सरकारला सुबुद्धी सुचावी, असे साकडे वाई तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने वाईच्या महागणपतीकडे करुन महागणपती मंदिर ते वाई तहसील कार्यालय असा मोर्चा काढून वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ, वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, लोणंदचे डॉ. नितीन सावंत, गोविंद इथापे, प्रवीण जाधव यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील कित्येक वर्षापासून आंदालने सुरू आहेत. मागील 1 वर्षापासून मराठा आरक्षण तसेच सगेसायरे कायदा व हैद्राबाद गॅजेटसह सातारा संस्थान व बॉम्बे गॅजेट लागू करण्यासाठी संघर्ष, योध्दा मनोजदादा जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून शासनाला त्यांच्या प्रकृतीची व मराठा समाजाच्या न्यायिक मागण्याचे काहीच देणे घेणे नसलयाचे मागिल 1 वर्षाच्या कृतीतून दिसल आहे. त्यामुळेच दादांच्या प्रकृतीची चिंता नसलेलया सरकारने श्री. मा. मनोज दादा जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्या मागण्यासाठी सकल मराठा समाज वाई तालुका मनोज दादाना जरांगे पाटलांना पाठींबा देत आहे. तरी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, असे नमूद केले आहे. दरम्यान, वाईच्या महागणपती मंदिरात आरती करुन आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरवात करत सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी सांगितले.