Satara Police Action: पोलीस बंदोबस्तात शाहुपूरी चौकातील अतिक्रमणे हटवली
पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे यांनी कोणालाही कारवाईदरम्यान फिरकू दिले नाही
सातारा : शाहुपूरी चौक ते रांगोळे कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामामध्ये शाहुपूरी चौकात रस्ता अरुंद बनला गेला होता. जुन्या शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या तिकाटण्यामध्ये रस्ता रुंद आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अतिक्रमण धारकांना अगोदर अल्टीमेटम दिला होता.
त्यांनी दिलेल्या मुदतीत स्वत: अतिक्रमणे काढून घेतली नव्हती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केली. रात्री अकरा वाजेपर्यंत सहा खोकी काढून रस्ता रंदीकरण करण्यात आले.
शाहुपूरी चौक ते रांगोळे कॉलनीकडे जाणारा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. रांगोळे कॉलनीत रस्ता रंद आहे. रस्त्याकडेचे खांबही हटवण्यासाठी स्थानिक सहकार्य करत आहेत. ठेकेदाराने रांगोळे कॉलनीतून खडी टाकून दोन महिने झाले. टाकलेली खडी तशीच आहे. पुढे खडी तशीच आहे.
दरम्यान, शाहुपुरी चौकात रस्ता अरुंद होता. कामामध्ये अडथळा येत होता. त्याबाबत सातारा बांधकाम विभागाच्यावतीने संबंधित रस्त्याची पाहणी करुन ज्यांची ज्यांची अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्यात अडथळा ठरू पाहत आहेत. त्यांना नोटीस बजावली होती. त्यांना डेडलाईन दिली होती. तरीही त्यांची खोकी तेथेच होती.
काहींनी स्वत:हून आली खोकी काढून घेतली होती. ज्यांनी खोकी काढून घेतली नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात केली. स्वत: बांधकामचे अभियंता प्रशांत खैरमोडे हे उपस्थित होते. रात्री 11 वाजेपर्यंत सहा खोकी काढण्यात आली.
दरम्यान, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हात्रे यांनी बंदोबस्तादरम्यान तेथील कोणत्याही नागरिकांना तेथे फिरकू दिले नाही. कारवाईदरम्यान अडथळा नको म्हणून त्यांनी स्ट्रीक्ट अॅक्शनमध्ये कोणालाही एखादा फोटो काढून दिला नाही. तरीही नागरिकांनी इमारतीवरुन फोटो काढले.
आम्ही अगोदर नोटीस बजावली होती
"शाहुपूरी चौक ते रांगोळे कॉलनीतल्या रस्त्याचे काम बांधकाम विभाग करत आहे. या कामात शाहुपूरी चौकात अडथळा ठरत असलेल्यांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावूनच कारवाई केली आहे."
- प्रशांत खैरमोडे, अभियंता